पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमाभागात तणाव शिगेला पोहोचला असून दोन्ही देशांमध्ये हल्ल्यांची मालिका सुरू झाली आहे. रविवारी पाकिस्ताननेअफगाणिस्तानच्या कंदहार प्रांतात दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केले, ज्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या लष्करी छावणीवर हल्ला केल्याचा दावा केला आहे.
पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्ला तारार यांनी एक्सवर माहिती दिली की, पाकिस्तानी लष्कराने कंदहारमध्ये रात्रीच्या वेळी मोठी कारवाई केली. या हल्ल्यात दहशतवाद्यांची शस्त्रास्त्रे, साहित्याची साठवणूक केंद्रे उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानच्या मते, अफगाण भूमीवरून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना लगाम घालण्यासाठी हे पाऊल उचलले गेले.
अफगाण सरकारचे प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहिद यांनी पाकिस्तानने कंदहारमध्ये दोन ठिकाणी हल्ले केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगतानाच, मुजाहिद यांनी पाकिस्तानवर युद्धाच्या आगीत तेल ओतत असल्याचा आरोप केला. या कारवाईला चोख प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला की, त्यांनी पाकिस्तानच्या दक्षिण वझिरीस्तान भागातील एका लष्करी छावणीवर हल्ला केला. यामध्ये कमांड सेंटरसह इतर सुविधांचे मोठे नुकसान झाले असून अनेक पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा तालिबान सरकारने केला आहे.
पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयाने अफगाणिस्तानचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. पाकिस्तानच्या मते, त्यांनी केवळ अफगाण ड्रोन पाडला असून त्यांच्या कोणत्याही लष्करी तळाचे नुकसान झाले नाही. दुसरीकडे, अफगाणिस्तानने कुनार आणि नंगरहार प्रांतांतून सीमेपलीकडे जाऊन पाकिस्तानची एक लष्करी चौकी ताब्यात घेतल्याचाही दावा केला आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी सीमापार हल्ला केला होता, तेव्हापासून हा संघर्ष पुन्हा पेटला आहे. यामुळे ऑक्टोबरमध्ये कतारच्या मध्यस्थीने झालेली युद्धबंदी मोडीत निघाली आहे. रविवारी अफगाणिस्तानातून झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या बाजौर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी शनिवारी आरोप केला की, अफगाणिस्तानने नागरी भागांत ड्रोन हल्ले करून लक्ष्मण रेषा ओलांडली आहे.
पाकिस्तानचा असा आरोप आहे की, अफगाणिस्तानमधील तालिबान शासन 'तहरीक-ए-तालिबान'सारख्या दहशतवादी गटांना आश्रय देत आहे. अफगाणिस्तानने मात्र हे आरोप नेहमीप्रमाणे फेटाळून लावले आहेत. सध्या दोन्ही देशांमधील परिस्थिती अत्यंत स्फोटक असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर या घडामोडींकडे चिंतेने पाहिले जात आहे.
Web Summary : Pakistan and Afghanistan tensions rise with escalating attacks. Pakistan targeted Kandahar, claiming to hit terrorist havens. Afghanistan retaliated, alleging strikes on Pakistani military posts. Both sides deny losses but claim inflicting damage, raising war fears amid ongoing border clashes.
Web Summary : पाकिस्तान और अफगानिस्तान के बीच तनाव बढ़ता जा रहा है, हमले तेज हो गए हैं। पाकिस्तान ने कंधार को निशाना बनाया और आतंकवादी ठिकानों पर हमला करने का दावा किया। अफगानिस्तान ने जवाबी कार्रवाई करते हुए पाकिस्तानी सैन्य चौकियों पर हमले का आरोप लगाया। दोनों पक्ष नुकसान से इनकार करते हैं लेकिन नुकसान पहुंचाने का दावा करते हैं, जिससे सीमा पर चल रहे संघर्षों के बीच युद्ध का डर बढ़ गया है।