शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

भारताच्या प्रत्युत्तरामुळे पीओकेत आतापर्यंतचं सर्वात मोठं नुकसान; पाकिस्तानची कबुली

By कुणाल गवाणकर | Published: November 14, 2020 9:43 AM

भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे ११ सैनिक ठार; बंकर, लॉन्च पॅड उद्ध्वस्त

इस्‍लामाबाद: दिवाळीच्या पूर्वसंध्येला भारतीय हद्दीत दहशतवादी घुसवण्यासाठी नियंत्रण रेषेवर बेछूट गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये पाकिस्तानचे ११ सैनिक मारले गेले. भारताच्या प्रतिहल्ल्यानं पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तान सरकारकडून हे नुकसान लपवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र पाकव्याप्त काश्मीरमधील नेत्यांमुळे पाकिस्तानचं पितळ उघडं पडलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील लिपा आणि नीलम खोऱ्यात आतापर्यंतचं सर्वात मोठं नुकसान झाल्याची कबुली पाकव्याप्त काश्मीरमधील नेत्यांनी दिली आहे.भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान बिथरला; सीमेवर बेछूट गोळीबार सुरूभारताच्या जोरदार प्रत्युत्तरानं नीलम, लिपा खोऱ्यात आणि मुझफ्फराबाद जिल्ह्यातल्या नौशेरा सेक्टरमध्ये मोठं नुकसान झाल्याची कबुली पीओकेच्या नागरी संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव सय्यद शाहिद मोहयिद्दीन कादरी यांनी दिली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'नं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 'भारताकडून गेल्या वर्षीदेखील नीलम खोऱ्यात मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला होता. मात्र यंदा करण्यात आलेला गोळीबार गेल्या वर्षीच्या प्रमाणात अधिक आहे. त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे,' असं कादरी म्हणाले.Video! बीएसएफने खटका ओढला! प्रत्युत्तरात पाकिस्तानचे 7 सैनिक ठार; एलओसीपार मोठे नुकसानइम्रान खान पाकव्याप्त काश्मीरमधील नेत्यांच्या रडारवरभारताकडून झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू आणि २५ हून अधिक जण जखमी झाल्याचं नीलम खोऱ्याचे उपायुक्त राजा महमूद शाहिद यांनी सांगितलं. या हल्ल्यात किमान १५ घरं उद्ध्वस्त झाल्याचा दावा त्यांनी केला. भारतीय सैन्याच्या धडाकेबाज प्रत्युत्तरानंतर पीओकेचे कथित पंतप्रधान राजा फारूक हैदर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला. सीमावर्ती भागातील पाकिस्तानी नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची? इथल्या नागरिकांना केव्हापर्यंत अशा हल्ल्यांचा सामना करावा लागणार? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.पाकिस्तान बिथरला; भारतीय राजदूतांना समन्सपाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. केरन, पुंछ आणि उरीमध्ये गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचे बंकर आणि लॉन्च पॅड भारतानं उद्ध्वस्त केले. भारताच्या या कारवाईनं पाकिस्तान बिथरला आहे. भारताच्या राजदूतांना पाकिस्तान सरकारनं समन्स बजावलं आहे. याशिवाय काल रात्रभर सीमावर्ती भागात बेछूट गोळीबार सुरू आहे.दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी या आठवड्यात पाकिस्तान सैन्यानं दुसऱ्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. याआधी ७-८ नोव्हेंबरलादेखील पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. या दरम्यान तीन दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. या तिन्ही दहशतवाद्यांचा भारतीय जवानांनी खात्मा केला.

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान