Video! बीएसएफने खटका ओढला! प्रत्युत्तरात पाकिस्तानचे 7 सैनिक ठार; एलओसीपार मोठे नुकसान

By हेमंत बावकर | Published: November 13, 2020 04:57 PM2020-11-13T16:57:30+5:302020-11-13T16:58:45+5:30

Pakistan ceasefire Violation: पाकिस्तानक़डून सीमेपलीक़डून मोठ्या प्रमाणावर उखळी तोफांचा मारा सुरु झाला आहे. यामध्ये काही घरेही उद्ध्वस्त झाली असून नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहेत.

7-8 Pakistan Army soldiers killed in retaliatory firing by Indian Army | Video! बीएसएफने खटका ओढला! प्रत्युत्तरात पाकिस्तानचे 7 सैनिक ठार; एलओसीपार मोठे नुकसान

Video! बीएसएफने खटका ओढला! प्रत्युत्तरात पाकिस्तानचे 7 सैनिक ठार; एलओसीपार मोठे नुकसान

Next

नवी दिल्ली : बारामुल्लामध्ये पाकिस्तानने केलेल्य़ा गोळीबारात बीएसएफचे सबइन्स्पेक्टर राकेश डोवाल शहीद झाले. तसेच तीन नागरिक मृत्यूमुखी पडले असून जवळपास 6 जण जखमी झाले आहेत. यानंतर बीएसएफने लगेचच पाकिस्तान्यांना प्रत्यूत्तर दिले असून यामध्ये 7 ते 8 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. यामध्ये स्पेशल सर्व्हिस ग्रुपचे 2-3 कमांडो ठार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 


पाकिस्तानक़डून सीमेपलीक़डून मोठ्या प्रमाणावर उखळी तोफांचा मारा सुरु झाला आहे. यामध्ये काही घरेही उद्ध्वस्त झाली असून नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाकिस्तानच्या गोळीबारात तीन जवान शहीद झाले आहेत. दोन जवान उरी सेक्टरमध्ये तर एक गुरेझ सेक्टरमध्ये शहीद झाले.





बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली. डोवाल शहीद झाले असून आणखी एक जवान जखमी झाल्याचे म्हटले आहे. एलओसीवर पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरु असून बीएसएफचे जवानही त्यांनी चोख प्रत्यूत्तर देत आहेत. राकेश डोवाल हे बीएशएफच्या युद्धसामुग्रीच्या बॅटरी युनिटमध्ये तैनात होते. दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानकडून झालेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात डोक्याला गंभीर दुखापत झाली. 


दुसरा जखमी कॉनस्टेबल वासू राजा यांना गळा आणि हाताला दुखापत झाली आहे. दोघेही शत्रूला प्रत्यूत्तर देण्याच्या मोहिमेवर तैनात होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच राजा यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे. 



 


तीन जवान शहीद
जम्मू काश्मीरमध्ये दिवाळीच्या आधी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरु झाली आहे. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये पाच दिवसांपूर्वी सीमारेषेजवळ सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये कॅप्टनसह तीन जवान  शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवादी मारले गेले आहेत. शहीदांमध्ये दोन सैन्याचे आणि एक बीएसएफचा जवान आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार कॉन्स्टेबल सुदीप सरकार हे माछिल सेक्टरमध्ये शहीद झाले. दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेमध्ये भारतीय जवान प्राणांची बाजी लावत आहेत. त्यांच्यासोबत बीएसएफचे जवान आहेत. संयुक्त मोहिम सुरु असल्याचे बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी रात्रीपासून माछिल सेक्टरमध्ये गस्ती पथकाला संशयस्पद हालचाली दिसल्या. यावेळी दहशतवादी मोठ्या संख्येने घुसखोरीचा प्रयत्न करत होते. या वेळी दहशतवाद्यांवर सैन्याने गोळीबार केला. यात दोन दहशतवादी मारले गेले आहेत. त्यांच्याकडून एक एके 47 रायफल आणि 2 बॅग ताब्यात घेण्यात आल्या आहेत. 



 

पाकिस्तानी नेत्याच्या लाहोर मतदारसंघात झळकले मोदी, अभिनंदनचे फलक

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज पक्षाचे खासदार सरदार अयाज सादिक यांचा मतदारसंघ असलेल्या लोहोरमध्ये ठिकठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासोबत अयाज सादिक यांचे छायाचित्र असलेली भव्य फलके शनिवारी झळकली. ही फलके सोशल मीडियावरही झळकली आहेत.
 

Web Title: 7-8 Pakistan Army soldiers killed in retaliatory firing by Indian Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.