शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

VIDEO - पाकिस्तानी लष्कराची लाज वाटते, पाकिस्तानी नेत्याच्या मुलीनेच काढली घाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2017 12:56 PM

शीरीन मझारींची मुलगी इमान मझारीने रास्तो रोको करणा-या कट्टरपंथीयांच्या मागण्या मान्य केल्याबद्दल लष्करावर अत्यंत कडवट शब्दात टीका केली आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानच्या न्यायालयाने सरकारचे कान उपटल्यानंतर सरकारने आंदोलकांविरोधात शक्ती प्रयोग करुन हटवण्याचा प्रयत्न केला.शीरीन मझारींची मुलगी इमान मझारीने रास्तो रोको करणा-या कट्टरपंथीयांच्या मागण्या मान्य केल्याबद्दल लष्करावर अत्यंत कडवट शब्दात टीका केली आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानातील राजकीय नेत्याच्या मुलीने आपल्याच लष्कराची घाण काढली आहे. पाकिस्तानातील तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या नेत्या शीरीन मझारींची मुलगी इमान मझारीने रास्तो रोको करणा-या कट्टरपंथीयांच्या मागण्या मान्य केल्याबद्दल लष्करावर अत्यंत कडवट शब्दात टीका केली आहे. पाकिस्तानी लष्कराची लाज वाटते. दहशतवादाविरोधात बलिदान देणा-या शहीदांचे उदहारण देतात पण त्याच दहशतवाद्यांशी हातमिळवणी करुन पैसे पुरवतात. पाकिस्तानी लष्कराची लाज वाटते या शब्दात इमान मझारीने पाकिस्तानी लष्कराची इज्जत काढली आहे. 

हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर काहीवेळातच इमानचे अकाऊंट टि्वटरवरुन गायब झाले असे पाकिस्तानी मीडियाने म्हटले आहे. हा व्हिडिओ काढून टाकण्याआधी पाकिस्तानात मोठया प्रमाणावर पाहिला गेला असे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या कायदा मंत्र्यांनी अल्लाहच्या नावावर शपथ घेण्यासंबंधी कायद्यामध्ये बदल केला होता. त्याविरोधात तहरीक-ए-लबाइक संघटनेने आंदोलन पुकारले होते.  

 

त्यांनी इस्लामाबाद-रावळपिंडी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारे रस्ता रोखून धरला होता. पाकिस्तानच्या न्यायालयाने सरकारचे कान उपटल्यानंतर सरकारने आंदोलकांविरोधात शक्ती प्रयोग करुन हटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाकिस्तानात मोठा हिंसाचारही झाला. याच मुद्यावरुन इमानने पाकिस्तानी लष्करावर टीका केली आहे. 

लष्कराने या आंदोलनात लक्ष घालून सरकारकडून आंदोलकांच्या सर्व मागण्या पूर्ण होतील हे सुनिश्चित केले असा खुलासा तहरीक-ए-लबाइकचा प्रमुख खादीम हुसैन रिझवीने केला. तोच धागा पकडून इमानने पाकिस्तानी लष्कराची घाण काढली आहे. इमानची आई शीरीन मझारी यांनी मात्र इमानच्या मतांशी आपण सहमत नसल्याचे स्पष्ट केले आहे. इमानने लष्कराबद्दल जी भाषा वापरली त्याचा मी निषेध करते. आई म्हणून इमानवर मी प्रेम करते पण तिच्या मताशी मी सहमत नाही असे शीरीन यांनी स्पष्ट केले आहे.  

                                                                                                                                                                                         

टॅग्स :Pakistanपाकिस्तान