शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

तुम्हालाही याचा त्रास होणार..; लादेनचा उल्लेख करत जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांना फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:24 IST

Pahalgam Terror Attack: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ब्रुसेल्समध्ये दहशतवादाबद्दल भारताची भूमिका स्पष्ट केली.

Pahalgam Terror Attack: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ब्रुसेल्स दौऱ्यात युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि ईयूच्या परराष्ट्र व्यवहार प्रमुख काजा कल्लास यांची भेट घेतली. यादरम्यान, त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केल्याबद्दल आणि दहशतवादाविरुद्ध लढण्यात एकता दाखवल्याबद्दल उर्सुला वॉन डेर लेयन यांचे कौतुक केले. तसेच, भारताचे धोरणात्मक महत्त्व, जागतिक स्थिती अधोरेखित करण्यासोबतच युरोपियन युनियनच्या प्रमुख धोरणांवर आक्षेप व्यक्त केला. 

दहशतवादाचा तुम्हालाही त्रास...जयशंकर यांनी दहशतवादाचा उल्लेख करत म्हटले की, मी तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून देऊ इच्छितो की, ओसामा बिन लादेन नावाचा दहशतवादी पाकिस्तानात सुरक्षित होता. जगाने हे समजून घ्यावे की, हा केवळ भारत-पाकिस्तानचा मुद्दा नाही. आम्हाला ठामपणे वाटते की, दहशतवादाला झिरो टॉलरन्स असले पाहिजे. याबाबत आपण कधीही आण्विक ब्लॅकमेलला बळी पडू नये. हे जगासमोरील एक मोठे आव्हान आहे. या विषयावर मजबूत आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि समज असणे अत्यावश्यक आहे. हा दहशतवादाचा मुद्दा आहे, शेवटी याचा तुम्हालाही त्रास होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

भारत एक विश्वासार्ह आर्थिक भागीदार युरोपीय युनियन आणि भारत मुक्त व्यापार करारावर सुरू असलेल्या वाटाघाटींबाबत बोलताना जयशंकर यांनी भारताला एक विश्वासार्ह आर्थिक भागीदार म्हटले. १.४ अब्ज लोकसंख्या असलेला भारत चीनपेक्षा कुशल कामगार आणि अधिक विश्वासार्ह आर्थिक भागीदारी देतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

रशिया-युक्रेन युद्धावर भाष्य रशिया-युक्रेन युद्धावर भारताच्या भूमिकेबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले, युद्धाद्वारे मतभेद सोडवता येतात, असे आम्हाला वाटत नाही. युद्धभूमीतून कोणताही तोडगा निघू शकत नाही. आम्ही निर्देशक किंवा निर्णायक नाही, पण आम्ही त्यात सहभागीही नाही. रशियाविरुद्धच्या निर्बंधांमध्ये सामील होण्यास भारताने नकार दिल्याबद्दल होत असलेल्या टीकेला उत्तर देताना जयशंकर म्हणाले, युक्रेनशी आमचेही मजबूत संबंध आहेत. पण, प्रत्येक देश स्वाभाविकपणे स्वतःचा अनुभव, इतिहास आणि हितसंबंध विचारात घेतो.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरS. Jaishankarएस. जयशंकरPakistanपाकिस्तानIndiaभारत