शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामच्या नावावर हिंसाचार; हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन...सर्वात मोठ्या मुस्लिम देशाने पाकिस्तानला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:38 IST

Pahalgam Attack: जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश इंडोनेशियाने भारताच्या दहशतवादावरील 'झिरो टॉलरन्स' धोरणाचे समर्थन केले आहे.

Pahalgam Attack: पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारतीय शिष्टमंडळ विविध देशांचे दौरे करत आहेत. याच पार्श्वभूमीवर जनता दल (यू) चे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सर्वात मोठा मुस्लिम देश इंडोनेशियातील नेत्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी इंडोनेशियाने भारताच्या दहशतवादावरील 'झिरो टॉलरन्स' धोरणाचे समर्थन केले आहे. इंडोनेशियाच्या नेहदलातुल उलेमा कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष केएच उलील अब्शर अब्दुल्ला म्हणाले की, इस्लाममधील काही संघटना इस्लामच्या नावाखाली हिंसाचाराला प्रोत्साहन देतात. दहशतवादाचा सर्वाधिक त्रास इतर कोणत्याही धर्मापेक्षा मुस्लिमांना होतो.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अब्शर अब्दुल्ला म्हणाले, इस्लाममधील काही गट इस्लामच्या नावाखाली हिंसाचाराला प्रोत्साहन देतात हे खरं आहे. इस्लाम हा शांतताप्रिय धर्म आहे, मुस्लिमांना शांतता हवी आहे. मी भारतातून आलेल्या खासदारांना सांगितले की, दहशतवादाचा सर्वाधिक त्रास हिंदू, बौद्ध किंवा ख्रिश्चन धर्माला नाही, तर मुस्लिमांना आहे. म्हणूनच मुस्लिमांनी या समस्येला योग्यरित्या सामोरे जाणे गरजेचे आहे.

शेपूट वाकडं ते वाकडंच! पाक सरकारचे मंत्री, हाफिज सईदचा मुलगा अन् पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड एकाच मंचावर...

अब्शर अब्दुल्ला पुढे म्हणतात, दक्षिण आशियातील लोकांना शांतता आणि सौहार्द हवे आहे. दहशतवादाचे उच्चाटन केल्याशिवाय आर्थिक आणि राजकीय स्थिरता येऊ शकत नाही. जर लोकांना धर्माची योग्य समज नसेल आणि हिंसाचाराला वैध ठरवण्यासाठी धर्मांचा वापर केला जात असेल, तर ते खूप धोकादायक आहे. इंडोनेशियाचा इतिहास भारताच्या इतिहासाशी आणि संस्कृतीशी जोडलेला आहे.

यादरम्यान शिष्टमंडळाने इंडोनेशियात किमान 20 मित्र देशांच्या स्थानिक राजदूतांची भेट घेतली. मित्र देशांच्या राजदूतांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध केला आणि या धोक्याचा सामना करण्यासाठी एकत्रित जागतिक प्रयत्नांची तातडीची गरज व्यक्त केली

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndonesiaइंडोनेशियाPakistanपाकिस्तान