शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 12:59 IST

हा हल्ला लष्कर ए तय्यबाच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. लष्कर ए तय्यबा आणि टीआरएफ यांच्यात संबंध आहेत असा उल्लेख रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या हल्ल्याने संपूर्ण देश हळहळला होता. आता या घटनेवर संयुक्त राष्ट्राच्या नव्या रिपोर्टमुळे पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. द रेजिस्टेंस फ्रंट या संघटनेने दोनदा पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली होती आणि हल्ल्याच्या ठिकाणचे फोटोही जारी केले होते. हा हल्ला पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबाच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या टीमने म्हटलं आहे.

UNSC मध्ये आयएसआयएल, अलकायदासारख्या दहशतवादी संघटनांवर वॉच ठेवणाऱ्या टीमने ३६ वा रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, २२ एप्रिलला ५ दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटनस्थळी हल्ला केला होता. त्याचदिवशी टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आणि हल्ल्याचे फोटोही जारी केले होते. टीआरएफने दुसऱ्या दिवशीही हल्ल्याची जबाबदारी घेतली. मात्र २६ एप्रिलला टीआरएफने त्यांचा दावा मागे घेतला होता. त्यानंतर टीआरएफने यावर कुठलेही विधान केले नाही, ना इतर कुठल्या दहशतवादी संघटनेने त्याची जबाबदारी घेतली असं सांगण्यात आले आहे.

तसेच हा हल्ला लष्कर ए तय्यबाच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. लष्कर ए तय्यबा आणि टीआरएफ यांच्यात संबंध आहेत. पहलगामचा हल्ला टीआरएफने केला असंही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने टीआरएफला जागतिक दहशतवादी संघटना घोषित करण्यासाठी प्रयत्न केले त्यानंतर याच महिन्यात अमेरिकेने या संघटनेला जागतिक दहशतवादी संघटना घोषित केले आहे. पहलगाम हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यात २५ भारतीय पर्यटक होते तर १ नेपाळमधील होता. या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केले होते. 

पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल

ऑपरेशन सिंदूर यावर लोकसभेत गेल्या २ दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्याला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. केंद्रात यापूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या सरकारांनी पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याच्या चालून आलेल्या संधी गमावल्या. त्यावेळी भारताकडे पाकिस्तानच्या भूभागासह त्याचे सैनिकही ताब्यात होते. पाकिस्तानातून करण्यात येणाऱ्या दहशतवादी कारवायांचा रस्ताच भारताने आता बंद केला आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत नेहमीच प्रयत्नशील असतो. काँग्रेस पक्ष हा पाकिस्तानच्या रिमोट कंट्रोलवर चालतो. ‘ऑपरेशन सिंदूर’ला तमाशा म्हणण्यात आले असा आरोप मोदींनी केला. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाunited nationsसंयुक्त राष्ट्र संघPakistanपाकिस्तानAmericaअमेरिका