अवघ्या ३७ हेक्टरचा देश, राहतात ३०० लोक; तरीही बेटावर चीनचा डोळा! काय आहे नेमकं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:07 IST2025-05-27T14:37:39+5:302025-05-27T15:07:28+5:30

फिलीपिन्सच्या नियंत्रणाखाली असलेल्या पगासा बेटाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. अवघ्या ३७ हेक्टरमध्ये पसरलेल्या या देशावर चीनची नजर आहे.

Pagasa A country of just 37 hectares, inhabited by 300 people; Still, China has its eyes on the island! What is the real reason? | अवघ्या ३७ हेक्टरचा देश, राहतात ३०० लोक; तरीही बेटावर चीनचा डोळा! काय आहे नेमकं कारण?

अवघ्या ३७ हेक्टरचा देश, राहतात ३०० लोक; तरीही बेटावर चीनचा डोळा! काय आहे नेमकं कारण?

फिलीपिन्सच्या नियंत्रणाखाली असलेले पगासा हे छोटेसे बेट सध्या प्रचंड चर्चेत आले आहे. पगासा या शब्दाचा अर्थ आहे आशा. या पगासा बेटाचा विस्तार अवघ्या ३७ हेक्टरमध्ये आहे. पगासा हे इतके लहान बेट आहे की, त्यावर अवघे ३०० लोक राहतात. या बेटावर लहान लहान लाकडी घरे आहेत. निळ्याशार पाण्यात मासेमारी करणे, आणि वाळूच्या किनाऱ्यांवर भाजीपाला पिकवणे, हा इथल्या लोकांचा अर्थार्जनाचा मार्ग आहे. मात्र, सध्या चीन या देशावर बारीक नजर ठेवून आहे. या बेटाला आपल्या अधिपत्याखाली घेण्यासाठी चीनच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. 

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, पगासा बेटाच्या पश्चिमेला चीनी जहाजांची फौज तैनात करण्यात आली आहे. समुद्रावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी चीनकडून नौदल, तटरक्षक दल आणि जहाजे तैनात केली गेली आहेत. गेल्या १० वर्षांत चीनने दक्षिण समुद्रात आपली उपस्थिती वाढवली आहे. चीनने समुद्रात बुडालेल्या प्रवाळ खडकांवर तीन विमानतळे बांधून अनेक जहाजे देखील तैनात केली आहेत. सागरी मार्गावर आपला दावा मजबूत करण्यासाठी चीनच्या हालचाली सुरू आहेत. पण, व्हिएतनाम आणि फिलीपिन्स याचा तीव्र विरोध करत आहेत.

फिलीपिन्सकडून जोरदार विरोध!
पगासामध्ये सामान्य लोक राहतात. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार या बेटावरची लोकसंख्या आणि घन जमीन आपल्या मालकीची असल्याचे फिलीपिन्सचे म्हणणे आहे. फिलीपिन्स राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सहाय्यक महासंचालक जॉनथन मलाया म्हणाले की, "पगासा आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या ठिकाणी एक हवाई पट्टी आहे, आमचे लोक इथे राहतात."    

१९७१ मध्ये फिलीपिन्सने तैवानकडून हे बेट ताब्यात घेतले आणि १९७८ मध्ये ते औपचारिकपणे आपल्या ताब्यात असल्याचे घोषित केले. नंतर फिलीपिन्स सरकारने लोकांना तिथे स्थायिक होण्यास प्रोत्साहित केले. या ठिकाणी सरकार दरमहा रेशन, पाणी आणि जीवनावश्यक वस्तू पुरवते. चार वर्षांपासून इथे वीज आणि मोबाईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली आहे. 

चीनची जहाजं लोकांना घाबरवतात!
चीनमुळे आता इथल्या लोकांना मासेमारी करणे कठीण झाले आहे. चीनची जहाजं लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात. त्यांची मोठमोठी जहाजं फार मोठ्या आवजातला हॉर्न वाजवून मासेमारांना पळवून लावतात, अशी आपबिती स्थानिक मच्छीमार सांगतात.

Web Title: Pagasa A country of just 37 hectares, inhabited by 300 people; Still, China has its eyes on the island! What is the real reason?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.