शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

आता पाकिस्तानात 'खिलजी'वरुन वाद, 'पद्मावत'वर बंदी आणण्यासाठी याचिका दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 15:27 IST

भारतानंतर आता पाकिस्तानात संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमाला विरोध होऊ लागला आहे.

नवी दिल्ली - भारतानंतर आता पाकिस्तानात संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमाला विरोध होऊ लागला आहे. दोन आठवड्यांपूर्वीच सेन्सॉर बोर्डाकडून 'पद्मावत' सिनेमाच्या रिलीजसाठी हिरवा कंदील मिळाला होता. यानंत देशभरात बॉक्सऑफिसवर सिनेमा झळकला. मात्र, सिनेमामध्ये मुस्लिमांचं चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचा आक्षेप घेत सिनेमावर बंदी आणावी यासाठी लाहौर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यानंतर पाकिस्तानातील सेन्सॉर बोर्डानं आणखी एकदा सिनेमाचे परीक्षण करण्यास सांगितले. 

यानुसार, पंजाब सेन्सॉर बोर्ड 'पद्मावत' सिनेमाचं पुन्हा एकदा परीक्षण केले. यासाठी संपूर्ण बोर्डाची बैठक बोलावण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, पंजाब सेन्सॉर बोर्डकडून अद्यापपर्यंत लेखी स्वरुपात अधिकृतरित्या यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. मात्र  बोर्डातील सदस्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आल्यानंतर हे प्रकरण समोर आले. यानंतर सिनेमातील दृश्य आणि संवादांचं परीक्षण केल्यानंतर 'पद्मावत'वर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

भारतातही 'पद्मावत'ला झाला होता तीव्र विरोधइतिहासात छेडछाड झाल्याचा आरोप करत राजपूत करणी सेनेनं 'पद्मावत' सिनेमाविरोधात हिंसक आंदोलनं केली होती. राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिलजी यांच्यामध्ये ड्रीम सीक्वेन्स दाखवण्यात आल्याचा आरोप करणी सेनेकडून करण्यात आला होता. राजपूत करणी सेनेच्या सदस्यांनी संजय लीला भन्साळी आणि दीपिका पादुकोणला जीवेमारण्याची धमकी दिली होती. मात्र सिनेमामध्ये कोणतीही आक्षेपार्ह दृश्य चित्रित करण्यात आले नव्हते. दरम्यान, पद्मावतमध्ये राजपूतांची शौर्यगाथा दाखवण्यात आल्याचं सांगत, यापुढे सिनेमाला विरोध करणार नाही, असे करणी सेनेनं स्पष्ट केले होते. काही दिवसांपूर्वीच करणी सेनेनं सिनेमागृहात पद्मावत पाहिल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली होती. 

पद्मावतनं तोडला 'टायगर जिंदा है'चा रेकॉर्ड 'पद्मावत'नं बॉक्सऑफिसवर शानदार कमाई केली आहे. आतापर्यंत सिनेमानं भारतात 225.50 कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. सिनेमामध्ये दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

टॅग्स :Padmavatपद्मावतRanveer Singhरणवीर सिंगDeepika Padukoneदीपिका पादुकोणShahid Kapoorशाहिद कपूरSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्साळीPakistanपाकिस्तान