Oscar 2017 : दिग्गजांसोबत ज्येष्ठ अभिनेते ओम पुरीना श्रद्धांजली

By Admin | Updated: February 27, 2017 16:25 IST2017-02-27T16:25:16+5:302017-02-27T16:25:16+5:30

अभिनेते ओम पुरी यांना 89 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात श्रद्धांजली वाहण्यात आली. कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा पार पडला.

Oscar 2017: Veteran actor Om Purina tribute with veterans | Oscar 2017 : दिग्गजांसोबत ज्येष्ठ अभिनेते ओम पुरीना श्रद्धांजली

Oscar 2017 : दिग्गजांसोबत ज्येष्ठ अभिनेते ओम पुरीना श्रद्धांजली


ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. 27 - भारदस्त आवाज, पल्लेदार संवादफेक आणि कसदार अभिनयाने रुपेरी पडद्यावर दीर्घकाळ आपली छाप उमटविणारे अभिनेते ओम पुरी यांना 89 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात श्रद्धांजली वाहण्यात आली. कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा पार पडला. सारा बरेइलिसकडून दिवंगत कलाकारांच्या स्मरणार्थ गीत सादर करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

ओम पुरी यांनी ईस्ट इज ईस्ट, गांधी, सिटी ऑफ जॉय , माय सल दी फॅनेटिक, दी पॅरोल ऑफिसर, वूल सारख्या आंतराष्ट्रीय चित्रपटात त्यांनी काम केलेले आहे. 6 जानेवारी 2017 रोजी हृदयविकाराने ओम पुरी यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी नंदिता आणि मुलगा ईशान असा परिवार आहे.

ओम पुरींना ऑस्कर सोहळ्यात कॅरी फिशर, प्रिंस, जेने वाईल्डर, मायकल किमिनो, पॅटी ड्यूक, गॅरी मार्शल, अँटन येल्चिन, मॅरी टेलर मूर, कर्टिस हॅन्सन आणि जॉन हर्ट यांच्यासोबत श्रद्धांजली वाहण्यात आली. कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये ज्येष्ठ अभिनेते ओम पुरीना श्रद्धांजली वाहण्यात आल्यानंतर बॉलिवूडमधील कलाकरांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या. यामध्ये यामी गौतम अनुपमा चोप्रा, सोनू सूद यांचा समावेश आहे. 

 

 

Web Title: Oscar 2017: Veteran actor Om Purina tribute with veterans