शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

'ऑर्डर ऑफ द ड्रक ग्याल्पो', PM नरेंद्र मोदींचा भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 17:53 IST

भूतानने पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे.

Narenda Modi in Bhutan: पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. पीएम मोदी सध्या दोन दिवसांच्या भूतान (Bhutan) दौऱ्यावर गेले असून, भूतानने मोदींना त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. अशाप्रकारे भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे मोदी पहिलेच नेते ठरले आहेत. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक (Jigme Khesar Namgyel Wangchuck) यांनी पीएम मोदींना 'ऑर्डर ऑफ द ड्रक ग्याल्पो' (Order of The Druk Gyalpo) पुरस्काराने सन्मानित केले. 

पुरस्कार 140 कोटी भारतीयांना समर्फितभूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाल्यानंतर पीएम मोदींनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, 'भारतीय म्हणून माझ्या आयुष्यातील आजचा दिवस मोठा आहे. प्रत्येक पुरस्कार हा खास असतो, पण जेव्हा एखादा पुरस्कार दुसऱ्या देशाकडून मिळतो, तेव्हा आपले दोन्ही देश योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचा आत्मविश्वास दृढ होतो. भारत आणि भूतानमधील संबंध जितके प्राचीन आहेत, तितकेच नवीन आणि समकालीन आहेत. हा पुरस्कार मी 140 कोटी भारतीयांना समर्फित करतो,' असं मोदी यावेळी म्हणाले.

पीएम मोदींच्या गाण्यावर गरबा सादर पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यानिमित्त शुक्रवारी भूतानची राजधानी थिम्पू येथे पोहोचले. पारो विमानतळावर पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे हे मोदींच्या स्वागतासाठी आले होते. पारो आंतरराष्ट्रीय विमानतळ ते थिंपू, हा 45 किमी लांबीचा मार्ग भारत आणि भूतानच्या ध्वजांनी सजवण्यात आला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भूतानच्या नागरिकांनी पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत केले. राजधानीत पीएम मोदींच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमांमध्ये अनेक सांस्कृतिक सादरीकरणे करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींनी लिहिलेल्या गाण्यावर गरबा करण्यात आला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBhutanभूतानIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय