शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महिला अँकर्सचा चेहरा झाकण्याला विरोध, पुरुषांनीही लावले मास्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 09:14 IST

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकारविरोधात लढा

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्येमहिला वृत्त निवेदकांच्या समर्थनार्थ तेथील पुरुष सहकारी आता पुढे आले आहेत. दूरचित्रवाहिन्यांवरील सर्व महिला वृत्त निवेदकांनी प्रक्षेपणादरम्यान त्यांचा चेहरा झाकण्याच्या तालिबान प्रशासनाच्या आदेशाचा निषेध करण्यासाठी अनेक पुरुष सहकाऱ्यांनीही पूर्ण चेहरा झाकून वृत्त निवेदन करण्यास सुरुवात केली आहे. 

महिलांसोबतच पुरुष वृत्त निवेदकदेखील मास्क घालून बातम्या देत असल्याची काही छायाचित्रे टोलो न्यूजने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केली आहेत. तालिबानच्या आदेशाचे पालन न करण्याचे धाडस जरी पुरुष सहकारी दाखवू शकत नसले तरी निषेध म्हणून त्यांनीही चेहरा झाकून बातम्या देण्यास सुरुवात केली आहे. या प्रकाराचा निषेध नोंदवल्याबद्दल अफगाणिस्तानच्या पुरुष वृत्त निवेदकांचे सोशल मीडियावरही खूप कौतुक होत आहे. तालिबानी आदेशाचा निषेध करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रकारही स्वतःचा चेहरा झाकून पाठिंबा देत आहेत. यासाठी सोशल मीडियावर  #FreeHerFace ही मोहीम राबवली जात आहे. अनेक पत्रकार या मोहिमेअंतर्गत ट्विटरवर मास्क घातलेले फोटो टाकून तालिबानच्या आदेशावर टीका करत आहेत. जगभरातून नेटकरीही यावरून संताप व्यक्त करत आहेत. तसेच, मानवाधिकार कार्यकर्त्यांनी याचा निषेध केला आहे.

मुलींवरील निर्बंधांत वाढगेल्या वर्षी अमेरिकेने आपले सैन्य मागे बोलावून घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधील लोकनियुक्त हमीद करझई सरकार पदच्युत करून तालिबान राजवट लागू झाली. तालिबानची सत्ता आल्यापासून अफगाण महिला आणि तरुण मुलींवरील निर्बंधांमध्ये वाढ होत आहे.

nमे महिन्याच्या सुरुवातीला तालिबानने सार्वजनिक ठिकाणी महिलांनी त्यांचा चेहरा पूर्णपणे झाकलेला असावा, असा आदेश दिला. चेहरा झाकून टीव्हीवर येण्याच्या तालिबान प्रशासनाचा आदेश सुरुवातीला काही मोजक्या वृत्तवाहिन्यांनी अमलात आणला.nप्रमुख वाहिन्यांच्या महिला निवेदिकांनी चेहरा न झाकता वृत्त प्रसारित केले. मात्र तालिबानने आदेशाच्या अंमलबजावणीला सुरुवात केल्यानंतर बहुतांश महिला निवेदक त्यांचे चेहरे झाकलेले दिसत आहेत.

 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानWomenमहिलाTelevisionटेलिव्हिजन