Operation Sindoor: भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तातील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्धवस्त केले. या कारवाईनंतर पाकिस्ताचा तिळपापड झाला असून, पाक सरकारमधील मंत्री भारताबाबत चुकीचे दावे करताना पाहयला मिळत आहेत. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने भारताचे 5 राफेल विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जातोय. पण, आता पाकच्या खोटारडेपणा जगासमोर उघडा झाला आहे. याबाबत पुरावा मागितला असता, पाकिस्तानची बोलती बंद झाली.
6-7 मे च्या मध्यरात्री भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ असलेल्या 9 ठिकाणांवर हल्ला केला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर 24 क्षेपणास्त्रे डागली. भारताच्या या हल्ल्यामुळे घाबरलेला पाकिस्तानला आपला पराभव लपविण्यासाठी भारताचे 5 राफेल पाडल्याचा खोटा दावा करत आहे. पण, पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना याबाबत पुरावा मागितला असता, त्यांना उत्तर देता आले नाही.
पाहा व्हिडिओ:-
सोशल मीडियावर 5 राफेल पाडल्याचे दावे केले जाताहेत, असे उत्तर पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी दिले. त्यांच्या हा विधानामुळे शाहबाज शरीफ सरकारचा खोटारडेपणा संपूर्ण जगासमोर आला. विशेष म्हणजे, त्यांनी हे बालीश उत्तर सीएनएनसारख्या मोठ्या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत दिले. त्यांच्या उत्तराने एका देशाचे संरक्षण मंत्री इतके बेजबाबदार उत्तर कसे देऊ शकतात, असा प्रश्न विचारला जातोय. अँकरने जेव्हा ख्वाजा आसिफ यांना वारंवार पुराव्यांबद्दल विचारले, तेव्हा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांना कोणतेही उत्तर देता आले नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.