शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 18:46 IST

Operation Sindoor: पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांना अमेरिकेत एका पत्रकाराने भारत मुस्लिम विरोधी अजेंडा राबवत असल्याच्या आरोपांवर तोंडघशी पाडले होते. याला काही तास उलटत नाही तोच भुट्टो यांनी पाकिस्तानला अडचणीत आणणारे वक्तव्य केले आहे. 

पाकिस्तान एक दहशतवादी राष्ट्र असल्याचे जगभरात भारत सांगत आहे. पहलगाम हल्ला व त्याला प्रत्यूत्तर म्हणून राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरवर भारताने एवढी वातावरण निर्मिती केली आहे की आता पाकिस्तान काही केल्या आपली प्रतिमा बदलू शकत नाही. अशातच भारताच्या या खेळीला प्रत्यूत्तर देण्यासाठी पाकिस्ताननेही आपली टीम पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी तसेच भारताला बदनाम करण्यासाठी पाठविली होती. परंतू, ही टीमच आता तोंडघशी पडू लागली आहे. 

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांना अमेरिकेत एका पत्रकाराने भारत मुस्लिम विरोधी अजेंडा राबवत असल्याच्या आरोपांवर तोंडघशी पाडले होते. याला काही तास उलटत नाही तोच भुट्टो यांनी पाकिस्तानला अडचणीत आणणारे वक्तव्य केले आहे. 

संयुक्त राष्ट्रांत भुट्टो यांनी भारतातील दहशतवादी हल्ले केवळ आयएसआयच रोखू शकतो, यासाठी भारतीय यंत्रणांना आयएसआयशी बोलावे लागेल, असे म्हटले आहे. एकप्रकारे भुट्टो यांनी पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयच दहशतवादी हल्ले करवत असल्याचे कबुल केले आहे. भारताला आमच्या आयएसआयसोबत बसून चर्चा केल्याशिवाय दहशतवाद संपविण्याबाबत कोणताही पर्याय नसल्याचे ते म्हणाले आहेत. 

आयएसआयवर प्रॉक्सी दहशतवादी संघटना निर्माण करण्याचा आणि काश्मीर आणि देशाच्या इतर भागात दहशतवादी पाठवण्याचा आरोप भारत सातत्याने करत आला आहे. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या संघटनांना आयएसआयच पोसत आली आहे. भुट्टो हे पाकिस्तानी खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. यामुळे त्यांच्या या वक्तव्याला महत्व आले आहे. बिलावल सिंधू नदीच्या पाण्याच्या मुद्द्यावर जगभरातील देशांकडून मदत मागत आहेत. पाकिस्तानने आपण अमेरिकेसाठी दहशतवादी तयार केल्याचे देखील कबुल केले होते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादOperation Sindoorऑपरेशन सिंदूरAmericaअमेरिका