शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 12:59 IST

भारतीय सैन्य दलाने रात्री उशीरा ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केले. त्यात जैश ए मोहम्मदचा गड असणाऱ्या पंजाबच्या बहावलपूर येथेही हल्ला करण्यात आला.

पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारतानेपाकिस्तानवर स्ट्राईक केला आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी ठिकाणांना भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले. त्यात बहावलपूर येथे असणाऱ्या जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयालाही टार्गेट करण्यात आले. याठिकाणी जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचं कुटुंब होते. या हल्ल्यात मसूदच्या कुटुंबातील १० जण आणि त्याच्या जवळच्या ४ जणांचा मृत्यू झाला आहे. मसूद अजहरने या घटनेला पुष्टी दिली आहे.

या हल्ल्यानंतर मसूद अजहरने म्हटलं की, भारतीय हल्ल्यात माझ्या कुटुंबाचे १० सदस्य आणि ४ जवळचे सहकारी मारले गेले. या हल्ल्यात मी मेलो असतो तर बरे झाले असते असं त्याने सांगितले. मौलाना मसूद अजहरच्या मोठ्या बहिणीसह मौलाना कशफ साहबचं पूर्ण कुटुंब, शहीद आणि मुफ्ती अब्दुल रऊफचे नातवंडे, बाजी सादियाचा पती आणि तिच्या मोठ्या मुलीचे ४ मुले जखमी झाले आहेत. या हल्ल्यात महिला आणि मुले मारली गेली असं जैश ए मोहम्मद संघटनेने माहिती दिली.

भारतीय सैन्य दलाने रात्री उशीरा ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केले. त्यात जैश ए मोहम्मदचा गड असणाऱ्या पंजाबच्या बहावलपूर येथेही हल्ला करण्यात आला. पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. पहलगामच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यात अनेक महिलांना विधवा बनवले होते. धर्म विचारून हत्या केल्याचा आरोप होता. या दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. दहशतवाद्यांनी कधी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा त्यांना मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होते. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर हाती घेत दहशतवाद्यांना टार्गेट केले.

कोण आहे मसूद अजहर?

मसूद अजहर जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि मॉस्ट वाँटेड दहशतवादी आहे. मसूद भारतातील सर्वात धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक आहे. मसूद अजहरला १९९९ मध्ये इंडियन एअरलाईन्सच्या हायजॅक केल्याप्रकरणी अटक केले होते. त्यानंतर बंधक नागरिकांच्या सुटकेसाठी त्याला सोडण्यात आले. त्यानंतर तो पाकिस्तान लपून भारतात अनेक दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होता. २००१ साली मसूद अजहरच्या नेतृत्वात जैश ए मोहम्मदने भारतीय संसदेवर हल्ला केला होता. २००० मध्ये जम्मू काश्मीर विधानसभा, २०१६ साली पठाणकोट एअरबेस आणि २०१९ साली पुलवामा दहशतवादी हल्ल्यात त्याचा सहभाग होता.

टॅग्स :masood azharमसूद अजहरOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद