India-Pakistan Tension : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूरअंतर्गतपाकिस्तानवर कठोर कारवाई केली. या कारवाईनंतर पाकिस्तानच्या नेत्यांमध्ये भीती स्पष्टपणे दिसून येत आहे. यामुळे पाकिस्तानातील काही नेते मू्र्खपणाचे आणि हास्यास्पद विधाने करत आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तर संसदेत बोलताना असे वक्तव्य केले, ज्यामुळे पुन्हा एकदा नाच्चकी झाली.
मुलांना सीमेवर पाठवणार...पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ तेथील संसदेत बोलताना म्हणाले की, 'मदरशातील विद्यार्थी आपली दुसरी संरक्षण रांग आहे, यात शंका नाही. गरज पडली तर या मदराशातील विद्यार्थ्यांचा 100 टक्के वापर केला जाऊ शकतो,' असे वक्तव्य आसिफ यांनी केले आहे.
पाकिस्तानी नेत्यांमध्ये भारताची भीतीभारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या प्रत्युत्तर कारवाईनंतर पाकिस्तानी सैन्याचे बरेच नुकसान झाले आहे. लाहोरमध्ये पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली देखील नष्ट झाली आहे. भारताच्या कारवाईची भीती संसदेतही दिसून आली. पाकिस्तानातील अनेक नेत्यांनी युद्ध करू नका, अशी सरकाराल विनंती केली. एक खासदार तर चक्क संसदेत रडला. आणखी एका खासदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात तो म्हणतो, युद्ध सुरू झाले तर मी देश सोडून लंडनला पळून जाईन. यावरुनच तेथील नेत्यांमध्येही भारताची भीती स्पष्टपणे दिसत आहे.