शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला दिलेल्या शस्त्रास्त्रांचा बार फुसका कसा निघाला? उत्तर देताना चिनी संरक्षण प्रवक्त्यांची उडाली फे फे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 11:40 IST

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने चिनी शस्त्रास्त्रांचा वापर केला होता. मात्र ही शस्त्रास्त्रे भारताच्या माऱ्यासमोर फुसकी ठरली होती. त्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना आता चीनच्या संरक्षण प्रवक्त्यांची फे फे उडाल्याचं समोर आलं आहे.

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय संरक्षण दलांनी  ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर भारताच्या या कारवाईला पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानमधील अनेक हवाई तळांवर तुफानी हल्ला करत त्यांचं जबर नुकसान केलं होतं. भारताने केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने चिनी शस्त्रास्त्रांचा वापर केला होता. मात्र ही शस्त्रास्त्रे भारताच्या माऱ्यासमोर फुसकी ठरली होती. त्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना आता चीनच्या संरक्षण प्रवक्त्यांची फे फे उडाल्याचं समोर आलं आहे.

ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने चिनकडून मिळालेल्या काही हत्यारांचा वापर केला होता. त्यातील काही क्षेपणास्त्रं लक्ष्यापर्यंत पोहोचली पण त्यांच्या स्फोट होऊ शकला नाही. चिनी बनावटीचं पीएल-१५ई त्यापैकीच एक क्षेपणास्त्र आहे. पाकिस्ताने भारताच्या दिशेने डागलेलं असंच एक क्षेपणास्त्र आता भारताने ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे चीनची मोठी नाचक्की झाली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात चिनी शस्त्रास्त्रांना आलेल्या अपयशाबाबत आलेल्या अपयशाबाबत प्रश्न विचारताच चीनच्या संरक्षण दलाच्या प्रवक्त्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. तसेच यावर कुठलंही स्पष्ट उत्तर न देता मुत्सद्देगिरीवर भाषण द्यायला सुरू केली.

चीनच्या संरक्षण दलाचे प्रवक्ते सीनियर कर्नल झांग जियाओगांग यांना पत्रकारांनी पीएल-१५ई या क्षेपणास्त्राबाबत विचारले. तेव्हा ते म्हणाले की, तेव्हा ते म्हणाले की, तुम्ही ज्या क्षेपणास्त्राचा उल्लेख केला आहे ते क्षेपणास्त्र एक निर्यात केलं जाणारं हत्यार आहे, तसेच अनेकदा देश-विदेशातील प्रदर्शनांमध्ये प्रदर्शित करण्यात आलेलं आहे.

पीएल-१५ई या क्षेपणास्त्राचा उल्लेख चीनकडून सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्र म्हणून केला जातो. मात्र जेव्हा पाकिस्तानने त्याचा वापर भारताविरोधात केला, तेव्हा त्याचा स्फोटच झाला नाही. भारताच्या सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी सुस्थितीत असलेलं हे क्षेपणास्त्र ताब्यात घेतलं आहे. हे क्षेपणास्त्र पंजाबमधील होशियारपूर येथे सापडलं होतं.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरchinaचीनPakistanपाकिस्तानIndiaभारत