शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

अमेरिकेचा नॉन इमिग्रंट व्हिसा मिळवण्यासाठी ट्रॅव्हल एजंटची गरज लागते का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 10:00 AM

व्हिसा अर्जाच्या प्रक्रियेबद्दलची खात्रीलायक माहिती कुठे मिळू शकेल? त्या प्रक्रियेदरम्यान मला शंका असल्यास मी काय करावं? 

प्रश्न: अमेरिकेच्या नॉन इमिग्रंट व्हिसासाठी मला ट्रॅव्हल एजंटची गरज लागेल का? व्हिसा अर्जाच्या प्रक्रियेबद्दलची खात्रीलायक माहिती कुठे मिळू शकेल? त्या प्रक्रियेदरम्यान मला शंका असल्यास मी काय करावं? उत्तर: अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना तुम्हाला ट्रॅव्हल एजंटची गरज लागत नाही. कोणाचीही मदत न घेता, त्यासाठी कोणतंही शुल्क न मोजता तुम्ही व्हिसासाठी अर्ज करू शकता. व्हिसासाठी अर्ज करताना आवश्यक असणारी योग्य आणि अचूक माहिती तुम्हाला www.ustraveldocs.com/in या संकेतस्थळावर मिळेल. या संकेतस्थळावर इंग्रजी आणि हिंदी भाषेत सविस्तर माहिती उपलब्ध आहे. विविध प्रकारचे व्हिसा, त्यासाठी आवश्यक पात्रता आणि अर्ज करण्याची प्रक्रिया याचा तपशील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावरील वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न (frequently asked questions) हा विभाग अर्जदारांसाठी उपयुक्त ठरतो. www.ustraveldocs.com/in या संकेतस्थळावर उत्तर न सापडल्यास किंवा तुम्हाला एखादा विशिष्ट प्रश्न असल्यास तुम्ही तो india@ustraveldocs.com या मेलवर विचारू शकता. ट्रॅव्हल एजंटची मदत घेत असताना काही गोष्टींची काळजी घ्या. तुम्ही दोन्ही ठिकाणी, अर्जात आणि मुलाखतीवेळी दिलेली माहिती पूर्ण आणि अचूक असावी. तुम्ही तुमचा अर्ज ऑनलाइन जमा करताना इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी करता. याचा अर्थ तुम्हाला अर्जातील प्रश्न समजले असून तुम्ही त्याची योग्य उत्तरं दिली आहेत असा होतो. त्यानंतर तुमच्या मुलाखतीआधी तुमच्या हातांच्या ठशांचं इलेक्ट्रॉनिक स्कॅनिंग केलं जातं. याचा अर्थ तुम्ही दिलेली उत्तरं पूर्णपणे खरी आहेत असा होतो. अशा वेळी तुम्हाला माहिती लपवण्यास किंवा चुकीची माहिती देण्यास सांगणारा ट्रॅव्हल एजंट योग्य नसल्याचं समजावं. व्हिसा मिळेलच याची खात्री कोणताही ट्रॅव्हल एजंट देऊ शकत नाही. तुम्हाला व्हिसा द्यायचा की नाही, याचा निर्णय दुतावासातील अधिकारी घेतो. तुमची मुलाखत पूर्ण झाल्यानंतर अधिकारी हा निर्णय घेतो. हा निर्णय इतर कोणतीही व्यक्ती घेत नाही. त्यामुळे कोणीही व्हिसा मिळवून देण्याची खात्री देत असल्यास सावध व्हा. खोटी कागदपत्रं पुरवून किंवा उत्तरं सुचवून एखादी व्यक्ती व्हिसाची हमी देत असल्यास काळजी घ्या. खोटी उत्तरं किंवा कागदपत्रं देताना पकडले गेल्यास तुम्हाला कधीही अमेरिकेचा व्हिसा मिळणार नाही.  

टॅग्स :USअमेरिकाAmericaअमेरिकाVisaव्हिसा