One crore migrants to get citizenship five lakh Indians to benefit in US | अमेरिका : एक कोटी स्थलांतरितांना नागरिकत्व मिळेल, पाच लाख भारतीयांना होणार फायदा

अमेरिका : एक कोटी स्थलांतरितांना नागरिकत्व मिळेल, पाच लाख भारतीयांना होणार फायदा

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जो बायडेन स्थलांतर विधेयकाला लगेचच मंजुरी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १ कोटी १० लाख स्थलांतरितांना त्या देशाचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अशा नागरिकांमध्ये पाच लाख भारतीयवंशीयांचाही समावेश आहे.


डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांबाबत कडक भूमिका घेतली होती. स्थलांतरितांमुळे अमेरिकेतील स्थानिक नागरिकांच्या रोजगार संधींवर गदा येते, असा ट्रम्प यांचा आक्षेप होता. त्यामुळे अमेरिकेत स्थलांतरितांची संख्या कमी कशी होईल, याप्रकारची धोरणे त्यांनी गेली चार वर्षे राबविली. 

बायडेन यांच्या पहिल्या भाषणाशी भारतीय संबंध -
जो बायडेन यांचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिले भाषण आणि त्यांच्या भाषणाशी भारताचे असलेला संबंध भारतीयांसाठी विशेष असेच आहे. बायडेन यांचे पहिले वहिले भाषण तयार करणाऱ्या गटाचे प्रमुख आहेत भारतीय वंशाचे विनय रेड्डी. त्यांनी यापूर्वीही निवडणूक प्रचारादरम्यान बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यासाठी भाषणे लिहिली आहेत. विनय रेड्डी हे ओहियो स्टेट युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लॉचे माजी विद्यार्थी आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: One crore migrants to get citizenship five lakh Indians to benefit in US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.