मोठा दिलासा! ओमायक्रॉन व्हेरिअंटवर प्रभावी अँटिबॉडीची ओळख पटली, कोरोना लढ्यात मिळणार मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 16:44 IST2021-12-29T16:43:39+5:302021-12-29T16:44:15+5:30
Coronavirus Omicron Variant: संपूर्ण जगभरात आता कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिअंटनं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.

मोठा दिलासा! ओमायक्रॉन व्हेरिअंटवर प्रभावी अँटिबॉडीची ओळख पटली, कोरोना लढ्यात मिळणार मदत
Coronavirus Omicron Variant: संपूर्ण जगभरात आता कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिअंटनं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. यातच एक मोठी दिलासादायक बातमी समोर आळी आहे. शास्त्रज्ञांना आता ओमायक्रॉन आणि कोरोना विषाणूच्या इतर व्हेरिअंटवर प्रभावी ठरणाऱ्या एका अँटिबॉडीची ओखळ पटली आहे. नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्चनुसार कोरोना विरोधी लस आणि अँटिबॉडी ट्रीटमेंट यांना तयार करण्यात यातून मोठी मदत मिळण्याची शक्यता आहे. नव्या फॉर्म्युलामुळे भविष्यात उद्भवू शकणाऱ्या सर्व व्हेरिअंट आणि ओमायक्रॉन विरोधात प्रभावी लस तयार करण्यास मोठी मदत होईल.
विषाणू वारंवार डोकं वर काढून निर्माण होणारे विविध व्हेरिअंटला दूर लोटता येईल असं स्पाइक प्रोटिन विकसीत होऊ शकतं असं या संशोधनातून दिसून येतं, असं अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसीनमधील प्रोफेसर डेविड वेल्सर यांनी सांगितलं.
ओमायक्रॉन व्हेरिअंटमध्ये स्पाइक प्रोटीनमधील म्यूटेशनची संख्या असमान्यपणे ३७ इतकी असते. जी सर्वाधिक आहे. व्हायरस याचा वापर मानवी पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि संसर्ग पसरविण्यासाठी करतो. हेच स्पाइक प्रोटिन तुम्हाला विषाणूचं परिवर्तन आणि व्हेरिअंट इतक्या वेगानं का पसरत आहे याची माहिती देतं असं मानलं जातं.
वेगानं पसरतोय ओमायक्रॉन व्हेरिअंट
ओमायक्रॉन व्हेरिअंटवरील अँटिबॉडीची लस तयार केली गेली तर मोठं यश प्राप्त होणार आहे. कारण यामाध्यमातून कोरोना महामारीला संपुष्टात आणणं शक्य होणार आहे. आतापर्यंत जगभरात ७० हून अधिक देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिअंट पोहोचला आहे.
दरम्यान, ओमायक्रॉन व्हेरिअंट वेगानं पसरत असल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत आहे. त्यामुळे देशांच्या सरकारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करावे लागत आङेत. अमेरिका, फ्रान्समध्ये रेकॉर्ड ब्रेक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. नव्या व्हेरिअंटचा वेग पाहता युरोप आणि अनेक देशांमध्ये आता लसीकरण बंधनकारक करण्यात आलं आहे. तसंच मास्कचा वापरावर देखील भर दिला जात आहे.