Omicron Variant: ओमायक्रॉनमुळं ब्रिटनमध्ये ७५ हजार मृत्यूची शक्यता; वैज्ञानिकांच्या दाव्यानं चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 13:49 IST2021-12-13T13:49:13+5:302021-12-13T13:49:35+5:30
अन्य देशांच्या तुलनेत UK मध्ये ओमायक्रॉन जास्त वेगाने पसरत आहे. प्रत्येक दिवशी या व्हेरिएंटचे ६०० पेक्षा अधिक रुग्ण आता समोर येत आहेत.

Omicron Variant: ओमायक्रॉनमुळं ब्रिटनमध्ये ७५ हजार मृत्यूची शक्यता; वैज्ञानिकांच्या दाव्यानं चिंता वाढली
नवी दिल्ली – कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉननं अनेक देशांची चिंता वाढवली आहे. जगभरात वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत वैज्ञानिकांनी पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉन व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑफ कंसर्न श्रेणीत टाकलं आहे. आता या नव्या व्हेरिएंटवर UK च्या वैज्ञानिकांनी एक स्टडी केली आहे. ज्याचा खुलासा धक्कादायक आहे.
या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, जर सुरक्षेचे अतिरिक्त उपाय केले नाही तर पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यापर्यंत कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे २५ हजार ते ७५ हजार मृत्यू होऊ शकतात. लंडनच्या स्कूल ऑफ हाइजीन एंड ट्रॉपिकल मेडिसिन आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्टेलनबोश यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी हा रिसर्च केला आहे.
स्टडी रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?
अन्य देशांच्या तुलनेत UK मध्ये ओमायक्रॉन जास्त वेगाने पसरत आहे. प्रत्येक दिवशी या व्हेरिएंटचे ६०० पेक्षा अधिक रुग्ण आता समोर येत आहेत. ही संख्या आणखी भयंकर असू शकते असा दावाही करण्यात येत आहे. ओमायक्रॉनपासून वाचण्याची क्षमता कमकुवत होत चालली आहे. बूस्टर डोसच्या हायडोस प्रभावी असूनही हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची शक्यता ६० टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. इंग्लंडमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोविड वेगाने पसरत आहे. जर वेळीच योग्य पावलं उचलली नाही तर ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण अधिक वेगाने वाढतील.
ओमायक्रॉन व्हेरिएंट UK आणि डेन्मार्कला वाढले आहेत. या व्हेरिएंटमुळे अधिक गंभीर आजार होऊ शकतो का? याबाबत अद्याप कुठलेही संकेत नाहीत. डेल्टाच्या तुलनेत या व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये सौम्य कोरोना लक्षण आढळत आहे. परंतु जसंजसे रुग्ण वाढत आहेत. हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. भारतातही मोठ्या शहरात ओमायक्रॉन व्हेरिएंट पसरत असल्याचं दिसून आलं आहे. आतापर्यंत ३८ रुग्ण भारतात आढळले आहे.
लहान मुलांसाठी धोकादायक
ब्रिटिश एक्सपर्टनुसार, ओमायक्रॉन व्हेरिएंट प्रत्येकासाठी एक मोठं आव्हान आहे. दक्षिण आफ्रिका आणि UK डेटानुसार, हा व्हेरिएंट लहान मुलांसाठी धोकादायक आहे. आता तो लहान मुलांमध्ये पसरत आहे. त्यांच्यात मध्यम ते गंभीर लक्षणं पाहायला मिळत आहे. याआधी कोरोनाचे जितके व्हेरिएंट आढळले तेव्हा मुलांमध्ये सौम्य किंवा काहीच लक्षणं आढळली नाही. ओमायक्रॉन व्हेरिएंटची लक्षणं प्रत्येकामध्ये वेगवेगळी असू शकतात असं डॉक्टरांनी सांगितले आहे.