Omicron CoronaVirus: 38 देशांत पसरला, एकाही मृत्यूची नोंद नाही; ओमायक्रॉनवर WHO चा मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 22:36 IST2021-12-04T22:34:44+5:302021-12-04T22:36:30+5:30
Omicron CoronaVirus Deaths so far: कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत कोरोनाने मृत्यूचा तांडव सुरु केला होता. नवा व्हेरिअंट ओमायक्रॉन हा कोरोनाच्या आजवरच्या सर्वात धोकादायक व्हेरिअंट डेल्टापेक्षाही अधिक वेगाने पसरणारा आहे.

Omicron CoronaVirus: 38 देशांत पसरला, एकाही मृत्यूची नोंद नाही; ओमायक्रॉनवर WHO चा मोठा दिलासा
जिनिव्हा: कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिअंट ओमायक्रॉनचे जगभरात रुग्ण वाढत आहेत. भारतातही गेल्या दोन दिवसांत चार रुग्ण सापडले आहेत. अशा या भीतीच्या वातावरणात WHO ने मोठा दिलासा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचा 38 देशांत प्रसार झाला आहे. मात्र, तरीही या व्हेरिअंटमुळे अद्याप एकही मृत्यू झालेला नाही, असे म्हटले आहे.
कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत कोरोनाने मृत्यूचा तांडव सुरु केला होता. नवा व्हेरिअंट ओमायक्रॉन हा कोरोनाच्या आजवरच्या सर्वात धोकादायक व्हेरिअंट डेल्टापेक्षाही अधिक वेगाने पसरणारा आहे. यामुळे ओमायक्रॉन जगभरात डेल्टापेक्षा जास्त खळबळ उडविणार असल्याचे बोलले जात होते. परंतू, हा व्हेरिअंट फक्त पसरतो, त्यामुळे रुग्ण गंभीर परिस्थितीत जात नसल्याचे समोर आले आहे. यामुळे गेल्या 10 दिवसांत जगभरातील 38 देशांत पसरूनही एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. हे देशासाठीच नव्हे तर जगासाठी देखील दिलासा देणारे आहे.
असे असले तरी देखील डब्ल्यूएचओने गाफील न राहण्याचे ठरविले आहे. डब्ल्यूएचओचे आपत्कालीन संचालक मायकेल रायन म्हणाले की, आम्हाला प्रत्येकाला आवश्यक असलेली उत्तरे मिळणार आहेत. अद्याप ओमिक्रॉनमुळे मृत्यू झाल्याचे समोर आलेले नाही. परंतू, नवीन प्रकाराच्या प्रसारामुळे पुढील काही महिन्यांत युरोपमध्ये निम्म्याहून अधिक लोक कोरोनाबाधित होऊ शकतात, असा इशारा दिला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी शुक्रवारी सांगितले की नवीन प्रकार जागतिक आर्थिक सुधारणांवर परिणाम करू शकतो.
24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. दोन दिवसांनंतर, डब्ल्यूएचओने ओमायक्रॉनला चिंताजनक प्रकारामध्ये घोषित केले. या नव्या प्रकारामुळे दक्षिण आफ्रिकेत कोरोनाची प्रकरणे 300 टक्क्यांनी वाढली आहेत. इतकेच नाही तर काही दिवसांत रुग्णालयांमध्ये पाय ठेवायला जागा राहणार नसल्याचे सांगितले जात आहे.
संबंधित बातमी...
Omicron Patient in Maharashtra: मोठी बातमी! महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला