हास्यास्पद! पाकिस्तानात ६० वर्षांचा वृद्ध 'गर्भवती'; खासगी लॅब सील करण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 15:22 IST2020-04-22T10:56:07+5:302020-04-22T15:22:42+5:30
जेव्हा याची सूचना सरकारी अधिकाऱ्यांना मिळाली तेव्हा त्यांना यामध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आला.

हास्यास्पद! पाकिस्तानात ६० वर्षांचा वृद्ध 'गर्भवती'; खासगी लॅब सील करण्याची वेळ
इस्लामाबाद : सायन्स आज एवढे पुढे गेले आहे की, त्याच्या मदतीने वृद्धेने बाळाला जन्म दिल्याचे बऱ्याचदा ऐकले आहे. मात्र, एखादा ६० वर्षांचा वृद्धाला गर्भधारणा झाल्यावर विश्वास बसणार नाही. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये या देशाच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंदवडे काढणार प्रकार समोर आला आहे. तेथील एका लॅबने या वृद्धाला प्रेग्नंट घोषित करून टाकल्याने नातेवाईकांच्या पायाखालची वाळूच घसरली आहे.
अल्ला बिट्टा नावाचा हा व्यक्ती खानेवालच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आला होता. त्याला युरीन टेस्ट करण्यास सांगण्यात आले. यामुळे तो खासगी लॅबमध्ये युरीन टेस्ट करण्यासाठी गेला होता. मात्र, जेव्हा त्याचा रिपोर्ट आला तेव्हा धक्काच बसला. या रिपोर्टमध्ये त्याला प्रेग्नंट असल्याचे म्हटले होते.
जेव्हा याची सूचना सरकारी अधिकाऱ्यांना मिळाली तेव्हा त्यांना यामध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. हे प्रकरण पाकिस्तानच्या आरोग्य यंत्रणेच्या आयोगाकडे गेले. यानंतर खानेवालच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लॅबलाच टाळे ठोकले. तसेच लॅबच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. ही लॅब सरकारी हॉस्पिटलच्या बाजुलाच आहे. तपासानांतर ही लॅब अनधिकृत असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. या ठिकाणी कोणताही डॉक्टर काम करत नव्हता. ही लॅब गेल्या दोन वर्षांपासून सुरु होती.
जेव्हा हे प्रकरण सोशल मीडियावर पसरले तेव्हा युजरनी पाकिस्तानच्या आरोग्य व्यवस्थेची लक्तरे टांगायला सुरुवात केली. कोणी याला फेक न्यूज म्हटले तर कोणा सरकारला जबाबदार धरले आहे. तर अनेकांनी हे सांगितले की, आता लोकांनी पॅथॉलॉजी लॅबच्या रिपोर्टवर विश्वास कसा ठेवायचा.
आणखी वाचा...
कोरोना एकटा नाहीय! आणखी एक महाभयंकर संकट घेऊन येतोय; संयुक्त राष्ट्राचा इशारा
लॉकडाऊनमुळे नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर; ट्रम्प संकटात
एड्स, स्वाईन फ्ल्यू अमेरिकेतून पसरला; कोणी जबाबदार धरले का? चीनचा सवाल
फेसबुक-Reliance Jioचा 'मेगा प्लॅन'; तीन कोटी दुकानदार, शेतकरी होणार मालामाल
संजय राऊत यांच्या 'त्या' टीकेवरून शिवसेनेतच नाराजी?; 'मातोश्री'ची भूमिका वेगळी