तेलाच्या टँकरचा स्फोट, एक बेपत्ता

By Admin | Updated: May 30, 2014 03:32 IST2014-05-30T03:32:03+5:302014-05-30T03:32:03+5:30

जपानच्या नैऋत्य किनार्‍यावरील हेमजी बंदराजवळ तेलाच्या टँकरचा स्फोट झाला असून, यात टँकरवर असलेल्या आठजणांपैकी एकजण बेपत्ता आहे

Oil tanker blast, one missing | तेलाच्या टँकरचा स्फोट, एक बेपत्ता

तेलाच्या टँकरचा स्फोट, एक बेपत्ता

टोकिओ : जपानच्या नैऋत्य किनार्‍यावरील हेमजी बंदराजवळ तेलाच्या टँकरचा स्फोट झाला असून, यात टँकरवर असलेल्या आठजणांपैकी एकजण बेपत्ता आहे. टँकरचा स्फोट होताच धुराचे लोट उठले. आग विझवण्याचा प्रयत्न तटरक्षक जहाजांनी केला, पण टँकर जळून खाक झाला. टँकरवरील सात जणांची सुटका करण्यात आली; पण त्यातील चारजण गंभीरपणे भाजले आहेत. टँकरचा कॅप्टन बेपत्ता आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Oil tanker blast, one missing