Oil in Pakistan: पाकिस्तानात तेल सापडल्याच्या वृत्ताने जगभरात खळबळ उडाली आहहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर पाकिस्तानसोबत करारही केला आहे. पाकिस्तानचे म्हणणे आहे की, त्यांच्या ताब्यातील बलुचिस्तानमध्ये तेल आणि इतर खनिजांचे साठे सापडले आहेत. मात्र, बलुच नेते मीर यार बलोच यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना एक खुले पत्र लिहिले असून, बलुचिस्तान विक्रीसाठी नाही, असे म्हटले आहे.
मीर यार बलोच म्हणाले की, तुम्हाला (ट्रम्प) या प्रदेशातील प्रचंड तेल आणि खनिज साठ्यांबद्दल पूर्णपणे दिशाभूल करण्यात आली आहे. जनरल असीम मुनीरने तुम्हाला भूगोलाबद्दल चुकीची माहिती दिली आहे. हा भाग पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा भाग नाही, तर बलुचिस्तान प्रजासत्ताकाचा भाग आहे. हे ऐतिहासिकदृष्ट्या एक सार्वभौम राष्ट्र आहे. हा भाग विक्रीसाठी नाही. पाकिस्तान, चीन किंवा इतर कोणत्याही देशाला येथील संसाधनांचे शोषण करू देणार नाही, असे पत्रात म्हटले आहे.
अमेरिका-पाकिस्तान तेल करार
अलीकडेच ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत तेल कराराची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले होते की, कदाचित भविष्यात भारतही पाकिस्तानकडून तेल खरेदी करेल. अमेरिकेचा हा करार भारतावर दबाव आणण्याची रणनीती असू शकते. मात्र, बलुच नेते या कराराच्या विरोधात उघडपणे बोलत आहेत. या प्रदेशात चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) चा आधीच मोठा प्रभाव आहे, ज्यामुळे स्थानिक बलुच समुदायांचा सरकारवरील अविश्वास वाढला आहे.
बलुच नेत्यांचा ऐतिहासिक संघर्षबलुच लोक बऱ्याच काळापासून पाकिस्तानी कब्जा आणि चिनी आर्थिक घुसखोरीविरुद्ध लढत आहेत. CPEC प्रकल्पांबाबत या प्रदेशात निदर्शने आणि अगदी सशस्त्र संघर्षदेखील सामान्य झाले आहे.