शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरींवरील हल्ल्याने आखातातील तणावात तेल; इराणकडून सौदी, कतार, कुवेतमधील सर्व प्रमुख रिफायनरी लक्ष्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 09:14 IST

या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील संघर्ष अधिकच तीव्र झाला असून, जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे.

दुबई : इराणनेसौदी अरेबिया, कतार आणि कुवेतमधील प्रमुख ऊर्जा प्रकल्पांवर गुरुवारी केलेल्या हल्ल्यांमुळे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू दरात मोठी उसळी आली आहे. इस्रायलने एक दिवस आधी इराणच्या ‘साउथ पार्स’ वायू क्षेत्रावर केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ही कारवाई करण्यात आली. या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील संघर्ष अधिकच तीव्र झाला असून, जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे.

ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती ११८ डॉलर प्रतिबॅरलपर्यंत पोहोचल्या असून, २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धानंतर त्या ६० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील सुमारे २० टक्के तेल वाहतूक होते; मात्र इराणच्या कारवायांमुळे हा मार्ग जवळपास अडथळाग्रस्त झाला आहे. यूएईतील ‘अल धाफ्रा’ हवाई तळावर इराणी हल्ल्यांमुळे नुकसान झाल्याचे उपग्रह चित्रांवरून स्पष्ट झाले आहे. येथे सुमारे २,००० अमेरिकन सैनिक तैनात होते.

‘शेल’कडून नुकसानीचे मूल्यांकन ऊर्जा कंपनी शेलने कतारमधील रास लाफान औद्योगिक क्षेत्रातील ‘पर्ल जीटीएल’ प्रकल्पाच्या नुकसानीचे मूल्यांकन सुरू केल्याचे सांगितले. या हल्ल्यातील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली असून, कतार एनर्जी सोबत समन्वय साधून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

हवाई वाहतूक आणि लष्करी घडामोडीहाँगकाँगस्थित कॅथे पॅसिफिक एअरलाइनने दुबई आणि रियाधसाठीच्या उड्डाणे एप्रिलअखेरपर्यंत स्थगित केली आहेत. संघर्षामुळे अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी आखाती मार्ग टाळण्याचा निर्णय घेतला आहे.

तेलसाठ्यांवर हल्ल्याने युरोप चिंतेत फ्रान्सने या संघर्षाला बेजबाबदार म्हणत रमजान महिन्याच्या अखेरीस युद्धविरामाचे आवाहन केले. जर्मनीने कोणत्याही लष्करी मोहिमेत सहभागी होणार नाही. हल्ले थांबवल्यास मदत करू शकतो, असे म्हटले.ऑस्ट्रियाने युरोपला या युद्धात ओढू युरोपला ब्लॅकमेल करता येणार नाही, असे ठामपणे सांगितले.अरब लीगने या हल्ल्यांनी तेलदरात होणारी वाढ धोकादायक आहे. याचा फटका संपूर्ण जगाला बसेल.

चीनने आंतरराष्ट्रीय संबंधांत बळाचा वापर करू नका. हा संघर्ष तत्काळ थांबवून परिस्थिती नियंत्रणात ठेवावी, असे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाने इराणचे असे प्रत्युत्तरात्मक हल्ले बेजबाबदार आहे. त्यांनी युद्ध पेटवू नये, असे म्हटले.

‘इराणची सर्व पाणबुडी क्षमता निष्प्रभ’वॉशिंग्टन : इराणची नौदल क्षमता मोठ्या प्रमाणावर निष्प्रभ झाली असून, त्यांच्या सर्व ११ पाणबुड्या नष्ट झाल्याचा दावा अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीटर हेगसेथ यांनी केला.

 पीटर हेगसेथ यांनी उल्लेख केलेल्या इराणच्या पाणबुड्या या लहान आकाराच्या (मिजेट) असून, त्या आखातातील उथळ समुद्री प्रदेशात चालवल्या जातात.

पर्शियाचे आखात आणि होर्मुझ सामुद्रधुनीसारख्या अरुंद समुद्री मार्गांमध्ये या पाणबुड्यांमार्फत सहज लपून पाण सुरुंग पेरणे आणि टॉरपिडो हल्ले करणे शक्य होते. या युद्धात अमेरिकेचे सैन्य निर्णायक टप्प्यात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's Refinery Attacks Fuel Gulf Tensions; Targets Saudi, Qatar, Kuwait

Web Summary : Iran attacked refineries in Saudi Arabia, Qatar, and Kuwait after Israel hit Iran's gas field. Oil prices surged, disrupting global energy markets and air travel. Damage assessments are underway, raising concerns in Europe and prompting international calls for de-escalation.
टॅग्स :IranइराणWarयुद्धsaudi arabiaसौदी अरेबिया