दक्षिण कोरियात रुग्णांची संख्या ५०००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 04:27 IST2020-03-04T04:27:50+5:302020-03-04T04:27:54+5:30

चीननंतर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण दक्षिण कोरियात असून रुग्णांची संख्या ५ हजारांवर पोहोचली आहे.

 Number of patients in South Korea | दक्षिण कोरियात रुग्णांची संख्या ५०००

दक्षिण कोरियात रुग्णांची संख्या ५०००

सियोल : चीननंतर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण दक्षिण कोरियात असून रुग्णांची संख्या ५ हजारांवर पोहोचली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळवारी आणखी ४७७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशात आणखी दोन लोकांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या २८ झाली आहे.
दरम्यान, ‘शिचेओंजी चर्च आॅफ जीसस’शी संबंधित २ लाख ६० हजारांहून अधिक लोकांची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. कारण, संसर्गापैकी अर्ध्याहून अधिक रुग्ण या धार्मिक समूहाशी जोडलेल्या लोकांचे आहेत.
देशात पॉप संगीतापासून ते खेळापर्यंत अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. देशातील ९० टक्के रुग्ण हे दाएगू आणि शेजारी उत्तर ग्योंगसांग प्रांतातील आहेत.

Web Title:  Number of patients in South Korea