शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये कोरोनाच्या बळींची संख्या १७७०

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 03:51 IST

७०,५४८ लोकांना लागण; अनेक देशांत साथीचा फैलाव, चीनच्या पार्लमेंटचे वार्षिक अधिवेशन पुढे ढकलण्याचा विचार

बीजिंग : चीनमध्येकोरोना संसर्गामुळे बळी गेलेल्यांची संख्या १,७७० वर पोहोचली आहे, तसेच ७०,५४८ पेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत लागण झाली आहे. वुहान शहरातून कोरोनाची साथ जगभरात पसरली आहे. चीनशिवाय अन्य देशांत तीस ठिकाणी कोरोनाची साथ पसरली आहे. तैवान, फिलिपिन्स, हाँगकाँग, जपान, फ्रान्समध्ये प्रत्येकी एक रुग्ण मरण पावला आहे. चीनमध्ये मरण पावलेल्यांपैकी बहुतांश लोक हुबेई प्रांतातील आहेत.

पुढील देशांत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या याप्रमाणे आहे. सिंगापूर - ७५, हाँगकाँग - ५७, थायलंड -३४, दक्षिण कोरिया - ३०, मलेशिया - २२, तैवान - २०, व्हिएतनाम - १६, आॅस्ट्रेलिया - १५, मकाव - १०, भारत- ३, नेपाळ, श्रीलंका, कंबोडिया, फिनलंड, स्वीडन, बेल्जियम, इजिप्त प्रत्येकी एक रुग्ण, अमेरिका - १५, कॅनडा- ८, जर्मनी -१६, फ्रान्स -१२, ब्रिटन -९, इटली - ३, रशिया -२, स्पेन -२, संयुक्त अरब अमिरात - ९. कोरोना साथीने हाहाकार माजविल्यामुळे चीनच्या पार्लमेंटचे (नॅशनल पीपल्स काँग्रेस) वार्षिक अधिवेशन पुढे ढकलण्याचा विचार तेथील सरकारने चालविला आहे. हे अधिवेशन ५ मार्च रोजी बीजिंगमध्ये सुरू होणार होते. चीनच्या पीपल्स पोलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्स (सीपीपीसीसी) या सल्लागार मंडळासह पार्लमेंटचे होणारे अधिवेशन पुढे ढकलले तर तो चीनच्या राजकीय इतिहासातील आगळा निर्णय ठरणार आहे. क्रूझवर आढळले ९९ नवे रुग्णच्जपानमधील बंदरापासून दूरवर नांगरलेल्या डायमंड प्रिन्सेस या क्रूझवर असलेल्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले ९९ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे या क्रूझवरील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ४५४ झाली आहे.च्जपानचे नवे राजा नारुहितो यांच्या वाढदिवसानिमित्त २३ फेब्रुवारी रोजी आयोजिलेला सार्वजनिक समारंभ कोरोनाची साथ आणखी पसरण्याची भीती असल्याने रद्द करण्यात आला. नारुहितो यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी नागरिकांना राजवाड्यात प्रवेश देण्यात येणार होता; पण तो कार्यक्रम रद्द करण्यात आला.१४ अमेरिकी नागरिकांना संसर्गच्डायमंड प्रिन्सेस क्रूझवर अडकलेल्यांपैकी सुमारे ३०० अमेरिकी नागरिकांना एका विशेष विमानाने अमेरिकेत आणण्यात आले. त्यातील १४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या रुग्णांना विमानातील स्वतंत्र कक्षात बसविण्यात आले होते.

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना