जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 20:21 IST2025-08-09T20:21:21+5:302025-08-09T20:21:57+5:30
British Navy Leaked Radioactive Water: आण्विक पदार्थ हे किरणोत्सारी असल्याने त्यापासून निर्माण होणारा आण्विक कचरा हा मानव आणि निसर्गासाठी धोकादायक असतो. त्यामुळे त्यांची हाताळणी अगदी जपून करावी लागते. दरम्यान, अशा आण्विक कचऱ्याची विल्हेवाट लावता हलगर्जीपणा झाल्याची धक्कादायक घटना ही ब्रिटनमध्ये घडली आहे.

जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
आण्विक पदार्थ हे किरणोत्सारी असल्याने त्यापासून निर्माण होणारा आण्विक कचरा हा मानव आणि निसर्गासाठी धोकादायक असतो. त्यामुळे त्यांची हाताळणी अगदी जपून करावी लागते. दरम्यान, अशा आण्विक कचऱ्याची विल्हेवाट लावता हलगर्जीपणा झाल्याची धक्कादायक घटना ही ब्रिटनमध्ये घडली आहे. ब्रिटनमधील सर्वात गोपनीय आणि सुरक्षित लष्करी तळांपैकी एक असलेल्या स्कॉटलंडमधील लॉच लाँग किनाऱ्यावर असलेल्या कूलपोर्ट आर्मामेंट डेपोमधील किरणोत्सारी पाण्याची समुद्रात गळती झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या ठिकाणीच ब्रिटनचं रॉयल नौदल आपल्या पाणबुड्यांसाठीच्या अण्वस्त्रांचा साठा ठेवते. एका वृत्तानुसार प्रदूषणावर लक्ष ठेवणारी सरकारी संस्था असलेल्या स्कॉटिश एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सीच्या फाईल्समधून जुन्या आणि जीर्ण झालेल्या १५०० पाईपलाईन फुटल्याने ही गळती झाली आहे.
या कागदपत्रांमधील नोंदींनुसार या तळावरील सुमारे अर्धे कंपोनेंट आपल्या आयु्र्मानापेक्षा अधिक जुने हो. मात्र त्यांची दुरुस्ती किंवा बदलण्याचं काम वेळीच झालं नाही. एसईपीएने दिलेल्या माहितीनुसार २०१० ते २०१९ यादरम्यान, पाईप फुटण्याच्या घटना घडल्या. ऑगस्ट २०१९ मध्ये घडलेल्या घटनेत आण्विक हत्यारांवर प्रक्रिया करण्यात येणाऱ्या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं. हे पाणि किरणोत्सारी पदार्थांच्या संपर्कात येऊन दूषित झालं. तसेच उघड्या नळीतून लोच लाँगमध्ये गेलं.
मात्र एसईपीएने सांगितले की, यातील किरणोत्साराचा स्तर खूप कमी होता. तसेच मानवी आरोग्यासाठी त्याच्यापासून तत्कालीन धोका नव्हता. मात्र हा अनावश्यक किरणोत्सारी कचरा होता. देखभार आणि व्यवस्थापनामधील त्रुटीमुले तो निर्माण झाला होता.
हे प्रकरण इथेच थांबलं नाही. २०२२ मध्ये एसईपीए ने रॉयल नेव्हीवर आणखी गंभीर आरोप केला. रॉयल नेव्हीने अण्वस्त्रे असलेल्या साठवून ठेवलेल्या क्षेत्रामधील उपकरणांची योग्य देखभाल केली नाही. तसेच पाईपलाईन बदलण्याची योजनाही अपूर्ण आणि पुरेशी नव्हती, असा आरोप एसईपीएने केला. अंतर्गत चौकशीनंतर मार्च २०२० मध्ये संरक्षण मंत्रालयाने २३ सुधारणात्मक पावले उचलण्याचं आश्वासन दिलं. दरम्यान ही माहिती सहा वर्षे चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर ,स्कॉटिश माहिती आयुक्त डेव्हिड हेमिल्टन यांनी सरकारला या संदर्भातील माहिती जाहीर करण्याचे आदेश दिल्यानंतर समोर आली आहे.