शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

आता सीरियात माजणार हाहाकार...! बंडखोरांनी हमासच्या दहशतवाद्यांना जेलमधून सोडलं, असद लटकवणार होते फासावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 21:22 IST

बशर अल-असद यांच्या तुरुंगातून आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लोकांची सुटका करण्यात आली आहे...

सीरियाचे माजी राष्ट्रापती बशर अल असद यांनी देश सोडल्यानंतर, एकीकडे त्यांनी तयार केलेल्या तुरुंगांच्या कहाण्या आणि व्हिडिओ समोर येत आहेत. तर दुसरीकडे, बंडखोरांनी सीरिया आणि आसपास दहशत निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांना तुरुंगातून सोडायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सीरियाची राजधानी असलेल्या दमास्कसमधील सय्यदनाया तुरुंगातून सीरियन बंडखोरांनी हमास या दहशतवादी संघटनेच्या 678 दहशतवाद्यांची सुटका केली आहे. यांपैकी 65 दहशतवादी फाशीच्या प्रतीक्षेत होते. बशर अल-असद यांच्या तुरुंगातून आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लोकांची सुटका करण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे, तुरुंगातून सुटलेले हमासचे अनेक दहशतवादी हे स्थानिक पातळीवरील मोठे कमांडर असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, सीरियन बंडखोरांना बशर अल-असद यांनी केलेल्या दडपशाहीचे व्हिडिओ जगासमोर आणून, त्यांना खलनायक ठरवायचे आहे. याच बरोबर, तुरुंगात असलेल्या सर्वांची तत्काळ मुक्त करायचे आहे. यामुळे पुढील काही आठवडे सीरियामध्ये दहशतीचे वातावरण राहणार आहे. कारण जोपर्यंत तेथे सरकारच्या नावाने कोणी ताबा मिळवत नाही, तोवर दहशत आणि बंदुकीचे राज्य असणार आहे. हाहाकार असणार आहे.

इस्रायलनं नष्ट केली शस्त्रास्त्रे -दरम्यान, अमेरिकन हवाई दलाच्या बॉम्बर विमानांनी इस्रायलसह सीरियातील लष्करी तळांवर आणि रासायनिक शस्त्रांच्या कारखान्यांवर शक्तिशाली हवाई हल्ले करून ते नष्ट केले आहेत. सीरियतील ही शस्त्रास्त्रे बंडखोरांच्या हाती पडण्याची भीती अमेरिका आणि इस्रायलला वाटत होती. यामुळे त्यांनी ही कारवाई केली. 

गोलन हाइट्सजवळच्या 10 किमी परिसरावर इस्रायलचा कब्जा -तसेच, दुसरीकडे, इस्रायली सैन्याने सीरियाच्या सीमेतही प्रवेश केला आहे. 1974 च्या करारानंतर इस्त्रायलने सीरियाच्या भूमीवर पाऊल ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. एवढेच नाही तर, इस्त्रायली सैन्याने सीरियन सीमेत गोलन हाइट्सजवळच्या 10 किमी परिसरावर कब्जा करून त्याचे बफर झोनमध्ये रूपांतर केले आहे. यासंदर्भात भाष्य करताना इस्रायलने आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा हवाला दिला आहे. तसेच हे पाऊल काही काळासाठीच उचलण्यात आले असल्याचेही इस्रायलने म्हले आहे. 

टॅग्स :SyriaसीरियाterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद