भवितव्यासाठी आता कृती कराच - ओबामा

By Admin | Updated: December 1, 2015 03:11 IST2015-12-01T03:11:53+5:302015-12-01T03:11:53+5:30

मानवतेचे भवितव्य सुरक्षित राखण्यासाठी आता कृती करावी, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सोमवारी केले. भवितव्य बदलण्याची शक्ती आमच्याकडे

Now to take action for the future - Obama | भवितव्यासाठी आता कृती कराच - ओबामा

भवितव्यासाठी आता कृती कराच - ओबामा

 ले बोर्गेत (फ्रान्स) : मानवतेचे भवितव्य सुरक्षित राखण्यासाठी आता कृती करावी, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सोमवारी केले. भवितव्य बदलण्याची शक्ती आमच्याकडे अगदी येथे आता आहे; परंतु जर आम्ही या क्षणाचे महत्त्व ओळखले तरच, असे ओबामा जगातून आलेल्या १५० देशांच्या प्रमुखांची उपस्थिती असलेल्या या परिषदेत म्हणाले.
संमेलनापूर्वी सर्व नेत्यांनी पॅरिस हल्ल्यातील पीडितांच्या स्मरणार्थ एक मिनिट मौन पाळले. तत्पूर्वी ओबामा, ओलांद यांनी पिडितांना श्रद्धांजली अर्पण केली.

Web Title: Now to take action for the future - Obama