शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 11:54 IST

बेरूतच्या दक्षिण उपनगरात असलेल्या टोटल एनर्जीजवर इस्रायलने हवाई हल्ला केल्याचे वृत्त आहे...

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि नेतन्याहू यांच्यात सध्या शब्दिक द्वंद्व सुरू आहे. यातच आता इस्रायलने लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरूतमधील फ्रेन्च मल्टीनॅशनल कंपीनी  टोटलएनर्जीज गॅस स्टेशनला निशाना बनवले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, बेरूतच्या दक्षिण उपनगरात असलेल्या टोटल एनर्जीजवर इस्रायलने हवाई हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर आग लागली. मात्र, या हल्ल्यात कसल्याही प्रकारची जीवितहाणी झाल्याचे वृत्त नाही.

नेतन्याहू-मॅक्रॉन वाद - इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले "सर्व सभ्य देशांनी" इस्रायलसोबत संपूर्ण शक्तीनिशी उभे रहायला हवे. कारण आपण इराणच्या नेतृत्वाखालील "राक्षसी शक्तींसोबत लढत आहोत." याच वेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे इस्रायलवर शस्त्रास्त्रबंदी लादण्याचे आवान "लजास्पद" असल्याचेही म्हटले आहे.

शनिवारी एक व्हिडिओ संदेश जारी करत पंतप्रधान नेतन्याहू यांनी हे लज्जास्पद असल्याचे म्हणत, "दहशतवाद्यांच्या टोळ्या एकत्रितपणे उभ्या आहेत. मात्र जे देश कथितपणे या दहशतवादी टोळ्यांचा विरोध करत आहेत, त्याच इस्रायलवर शस्त्रास्त्र बंदीचे आवाहन करत आहेत," असे म्हटले आहे. नेतन्याहू यांच्या या विधानानंतर, मॅक्रॉन यांच्या कार्यालयाने तातडीने एक निवेदन जारी करत, "फ्रान्स इस्रायलचा पक्का मित्र आहे आणि तो इस्राइलच्या सुरक्षिततेचे समर्थन करतो. तसेच, इराण अथवा त्याच्या समर्थकांनी इस्रायलवर हल्ला केला, तर फ्रान्स नेहमीच इस्रायलसोबत उभा असेल," असे स्पष्ट केले आहे.

त्यांना लाज वाटायला हवी - नेतन्याहू  नेतन्याहू म्हणाले, "जेव्हा इस्रायल इराणच्या नेतृत्वाखालील राक्षसी शक्तींचा सामना करत आहे, तेव्हा सर्व सभ्य अथवा सुसंस्कृत देशांनी इस्रायलसोबत उभे राहायला हवे. मात्र, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि अन्य पाश्चिमात्य नेते आता इस्रायलवर शस्त्र बंदी लादण्याचे आवाहन करत आहेत. त्यांना लाज वाटायला हवी. इराण हिज्बुल्लाह, हुती, हमास आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांवर शस्त्रबंदी लादत आहे का? तर अजिबात नाही. दहशतवादी टोळ्या एकजुटीने उभ्या आहेत. मात्र, जे देश कथितपणे या दहशतवादी राष्ट्रांचा विरोध करतात, ते आता इस्रायलवर शस्त्रबंदी लादण्याची मागणी करत आहेत. हे अत्यंत लज्जास्पद आहे", असा संताप नेतन्याहू यांनी मॅक्रॉन यांच्या आवाहनानंतर व्यक्त केला आहे.

टॅग्स :Israelइस्रायलFranceफ्रान्सBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूwarयुद्धBombsस्फोटकेTerrorismदहशतवाद