न्यूयॉर्क : इलॉन मस्क यांच्या ‘मुलांची फौज’ तयार करण्याच्या योजनेत धक्कादायक बाब समोर आली आहे. मस्क महिलांशी संपर्क साधून मुलाला जन्म देण्याचा प्रस्ताव देत आहेत, यासाठी ते ‘एक्स’चा वापर करत आहेत. जपानी महिला टिफनी फोंगलाही ही ऑफर मिळाली. पण जेव्हा फोंगने याबाबतचे मस्क यांचे मेसेज सार्वजनिक केले तेव्हा मस्क यांनी तिला केवळ अनफॉलो केले नाही तर तिचे फॉलोअर्सही कमी झाले.
मुलांची फौज का हवी?
जपानी अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून एका महिलेला मस्क यांनी शुक्राणू दान केले. जगात हुशार लोक हवेत, यासाठी मुले आवश्यक आहेत. त्यामुळे ‘सभ्यतेचा नाश’ होण्यापूर्वी मुलांची फौज तयार करावी लागेल, असे मस्क यांचे मत आहे.
४ पत्नी, १४ मुले
मस्क हे किमान १४ मुलांचे वडील आहेत. जस्टिन विल्सन, गायिका ग्राइम्स, न्यूरोलिंकच्या संचालिका शिवॉन झिलिस आणि लेखिका ॲश्ली सेंट क्लेअर या त्यांच्या मुलांच्या माता आहेत.
झिलिसला जी चार मुले आहेत ती मस्कपासून झाली आहेत. त्यामुळे तिला ‘विशेष दर्जा’ आहे. झिलिसा ही पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून जागतिक नेत्यांपर्यंत मस्क यांच्या बैठकींमध्ये दिसली आहे.
गोपनीयतेसाठी मोठी किंमत
गोपनीयता हे मस्क यांच्या मिशनचे मुख्य इंधन आहे. ज्या महिलांनी परवानगी दिली त्यांना मोठा फायदा मिळाला. ज्यांनी प्रश्न उपस्थित केले त्यांना काहीही मिळाले नाही.
मस्क यांच्या १३व्या मुलाची आई सेंट क्लेअर यांनी सांगितले की, प्रसूतीदरम्यान मस्कच्या सहायकाने प्रस्ताव दिला होता की, जर तिने कागदपत्रांमध्ये मस्क यांचे नाव टाकले नाही, नाव दिले नाही तर तिला अंदाजे १२५ कोटी रुपये आणि महिन्याला ८३ लाख रुपये मिळतील.
त्यांनी ऑफर नाकारली असली, तरी मस्क यांचे नाव जोडले नाही. नंतर संबंध सार्वजनिक झाल्यावर मदतीची रक्कम कमी करण्यात आली.