शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 20:36 IST

अमेरिकेच्या मागणीवर अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिला इशारा

Taliban on Bagram Airbase: चार वर्षांपूर्वी अफगाणिस्तान सोडल्यानंतर अमेरिकेने पुन्हा एकदा नजर वळवली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानला कडक इशारा दिला आहे. जर अफगाणिस्तानने बग्राम हवाई तळ अमेरिकेला परत केला नाही तर तो निर्णय त्यांच्यासाठी खूप वाईट ठरू शकतो अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवजा इशाऱ्यानंतर अफगाणिस्ताननेही चोख प्रत्युत्तर दिलं. अफगाणिस्तान अमेरिकेला एक मीटरही जमीन देणार असा इशारा तालिबानच्या सरकारने दिला.

डोनाल्ड ट्रम्प यांचे अफगाणिस्तानातील बग्राम हवाई तळ ताब्यात घेण्याचे स्वप्न तालिबान उधळून लावत असल्याचे दिसून येत आहे. तालिबान सरकारने स्पष्ट नकार दिल्यानंतर, अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांनी ट्रम्प यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला. 'बग्राम हवाई तळ सोडाच पण आम्ही अमेरिकेला एक मीटरही अफगाणिस्तानची जमीन देणार नाही,' असं मुत्ताकी यांनी म्हटलं. टोलो न्यूजशी बोलताना मुत्ताकी यांनी हे विधान केले आहे.

बग्राम हवाई तळ सध्या तालिबानच्या ताब्यात आहे. २०२१ मध्ये अमेरिका आणि मित्र राष्ट्रांच्या सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर तालिबानने तो ताब्यात घेतला होता. तालिबानचे मुख्य प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी ट्रम्प यांच्या विधानांना नकार दिला आणि अमेरिकेला वास्तववादी आणि तर्कसंगत धोरण स्वीकारण्याचा सल्ला दिला. अफगाणिस्तानचे परराष्ट्र धोरण अफगाण लोकांच्या आर्थिक हितांवर केंद्रित आहे. द्विपक्षीय चर्चेदरम्यान अफगाणिस्तानचे स्वातंत्र्य आणि प्रादेशिक अखंडता सर्वोपरि आहे हे वारंवार सांगितले गेले आहे, असं  जबीहुल्लाह मुजाहिद यांनी म्हटलं.

"इस्लामिक तत्त्वांनुसार अर्थ-केंद्रित परराष्ट्र धोरणानुसार, इस्लामिक अमिराती ऑफ अफगाणिस्तान सर्व राज्यांशी परस्पर आणि सामायिक हितसंबंधांवर आधारित रचनात्मक संबंध ठेवू इच्छित आहे. इस्लामिक अमिरातीसाठी अफगाणिस्तानचे स्वातंत्र्य आणि प्रादेशिक अखंडता अत्यंत महत्त्वाची आहे हे अमेरिकेला सातत्याने कळवले आहे," असेही मुजाहिद यांनी म्हटलं.

या प्रकरणाबाबत, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने शुक्रवारी सांगितले की, चीन अफगाणिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करतो आणि अफगाणिस्तानचे भविष्य अफगाण लोकांच्या हातात असले पाहिजे. माध्यमांच्या वृत्तानुसार, सॅटेलाईट इमेजनुसार तालिबानच्या माघारीनंतर या हवाई तळावर फारच कमी हालचाली दिसून आल्या आहेत.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाTalibanतालिबान