थोडे थोडके नाही, ४१ देशांवर अमेरिका आणतेय ट्रॅव्हल बॅन; भारताचे शेजारी, लिस्ट आली समोर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 13:45 IST2025-03-15T13:44:44+5:302025-03-15T13:45:02+5:30

America Travel Ban: अमेरिकी सरकारने पाकिस्तानसह ४१ देशांवर प्रवास प्रतिबंध लादण्याची तयारी केली आहे. हे प्रतिबंध जास्त कठोर असणार आहेत.

Not a little bit, America is imposing a travel ban on 41 countries; India's neighbors, the list has come to light... | थोडे थोडके नाही, ४१ देशांवर अमेरिका आणतेय ट्रॅव्हल बॅन; भारताचे शेजारी, लिस्ट आली समोर...

थोडे थोडके नाही, ४१ देशांवर अमेरिका आणतेय ट्रॅव्हल बॅन; भारताचे शेजारी, लिस्ट आली समोर...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील घुसखोरीला संपविण्याचा विडा उचलला आहे. एकामागोमाग एक विमाने पाठवून अनधिकृतरित्या अमेरिकेत घुसलेल्या लोकांना मायदेशी पाठवून देत आहेत. आता तर त्यांनी या घुसखोरीवरच नाही तर अनेक देशांतून येणाऱ्या लोकांवरच कायमचा प्रतिबंध घालण्याचा प्लॅन आखला आहे. या देशांचे लोक अमेरिकेत अनधिकृतच काय तक अधिकृतरित्याही जाऊ शकत नाहीत, असा ट्रॅव्हल बॅन आणला जात आहे. 

अमेरिकी सरकारने पाकिस्तानसह ४१ देशांवर प्रवास प्रतिबंध लादण्याची तयारी केली आहे. हे प्रतिबंध जास्त कठोर असणार आहेत. यासाठी ४१ देशांची यादी बनविण्यात आली असून रेड, ऑरेंज आणि यलो अशा प्रकारात टाकण्यात आले आहे. सात मुस्लिम देशांचाही यात समावेश आहे. भारताच्या जवळच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भूतान या देशांचाही यात समावेश आहे. 

अमेरिकेचा व्हिसा आंशिक निलंबित करण्याच्या यादीत काही देशांना टाकण्यात येणार आहे. यात पाकिस्तानचाही समावेश आहे. असे २६ देश आहेत. यासाठी या देशांना त्यांच्या प्रक्रियेतील त्रुटी ६० दिवसांत दूर करायच्या आहेत. असे केल्यास पाकिस्तानला या कारवाईपासून वाचता येणार आहे. 

या यादीत तुर्कमेनिस्तान, बेलारूस, भूतान आणि वानुआतु यांचा देखील समावेश आहे. वानुआतु हा देश माजी आयपीएल अध्यक्ष ललित मोदी याच्यामुळे चर्चेत आला होता. मोदीला त्या देशाने नागरिकत्व दिले होते. यानंतर नाचक्की झाल्याने या देशाच्या पंतप्रधानांनी मोदीला दिलेले नागरिकत्व तातडीने रद्द करण्याचे आदेश दिले होते. या देशाने पैसे मोजून जगभरातील अति श्रीमंतांना आपल्या देशात आश्रय देण्यास सुरुवात केली आहे. हे एक भ्रष्टााचारी, गुन्हेगारांना लपण्याचे ठिकाण झाले आहे. 

रेड लिस्टमध्ये अफगाणिस्तान, क्युबा, इराण, लिबिया, उत्तर कोरिया, सोमालिया, सुदान, सीरिया, व्हेनेझुएला आणि येमेन हे देश आहेत. या देशाच्या नागरिकांना दिलेले व्हिसा रद्द केले जाणार आहेत. तसेच यापुढे या देशाच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश असणार नाही. 

Web Title: Not a little bit, America is imposing a travel ban on 41 countries; India's neighbors, the list has come to light...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.