उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगने काढला क्रूर आदेश, म्हणाला - जिवंत रहायचं असेल तर कमी खा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 13:05 IST2021-10-28T13:04:58+5:302021-10-28T13:05:32+5:30
North Korea Food Crisis : किम जोंगने देशातील लोकांना सांगितलं की, २०२५ पर्यंत जेवण कमी करा. जेणेकरून देश या खाद्य संकटातून बाहेर येऊ शकेल.

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगने काढला क्रूर आदेश, म्हणाला - जिवंत रहायचं असेल तर कमी खा...
उत्तर कोरियामध्ये (North Korea) सध्या खाद्य संकट (North Korea Food Crisis) फारच गंभीर होत चाललं आहे. या कारणाने उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) ने लोकांना कमी खाण्याचा क्रूर आदेश दिला आहे. किम जोंगने देशातील लोकांना सांगितलं की, २०२५ पर्यंत जेवण कमी करा. जेणेकरून देश या खाद्य संकटातून बाहेर येऊ शकेल.
कशामुळे आलं देशात हे संकट
गेल्या बऱ्याच वर्षापासून उत्तर कोरियात खाद्य उत्पादन कमी झालं आहे. इथे राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत खाण्या-पिण्याचा सप्लाय कमी झाला आहे. ज्यामुळे अर्थातच खाण्या-पिण्याचे भाग आकाशाला भिडले आहेत. किम जोंगने आपल्या निर्णयाला खाद्याच्या कमतरतेला दोषी ठरवत सांगितलं की, 'लोकांची खाद्य स्थिती आाता तणावपूर्ण होत आहे. कारण कृषी क्षेत्रात धान्य उत्पादनाची योजना अपयशी ठरली'.
कधीपर्यंत राहणार ही स्थिती
उत्तर कोरियातील प्रतिबंध, कोरोना व्हायरस महामारी आणि गेल्यावर्षी आलेल्या वादळामुळेही अन्न-धान्य कमी झालं. किम जोंग उनने काही दिवसांपूर्वीच मुसळधार पावसामुळे जास्त नुकसान झालेल्या भागात सैनिकांना मदत कार्यासाठी पाठवलं होतं. किमने हे मान्य केलं आहे की, देशात सध्या वाईट स्थिती आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात किमने सांगितलं की, खाद्याचं हे संकट देशात २०१५ पर्यंत राहणार आहे.