जगात कोरोनाचा धुमाकूळ अन् किम जोंग करतायेत क्षेपणास्त्रांचे परिक्षण, यामुळे त्यांच्यासाठी 'खास' होता आजचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 16:26 IST2020-04-14T15:51:04+5:302020-04-14T16:26:51+5:30
क्रुझ क्षेपणास्त्रे ईशांन्येकडील शहर मुनचोनजवळील भागातून सकाळी जवळपास 7 वाजण्याच्या सुमारास सोडण्यात आले, असे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ (जेसीएस) यांनी म्हटले आहे.

जगात कोरोनाचा धुमाकूळ अन् किम जोंग करतायेत क्षेपणास्त्रांचे परिक्षण, यामुळे त्यांच्यासाठी 'खास' होता आजचा दिवस
प्योंगयांग : संपूर्ण जग कोरोना व्हायरसचा सामना करता आहे. अनेक मातब्बर देश कोरोना व्हायरसपुढे हतबल होताना दिसत आहेत. मात्र, उत्तर कोरियावर याचा कसलाही परिणाम दिसत नाही. हुकुमशाह किम जोंग उन यांनी आपल्या देशात कोरोना नाही, हे आधीच स्पष्ट केले आहे. तर आज मंगळवारी त्यांनी क्षेपणास्त्रांचा मारा करत (परीक्षण) जगासमोर शक्ती प्रदर्शन केले. उत्तर कोरियाने आपले संस्थापक किम इल-सुंग यांच्या जयंती निमित्त फायटर जेटने हवेतून जमीनीवर क्षेपणास्त्रांचा मारा केला.
योनहाप या वृत्त संस्थेने यासंदर्भात माहिती दिली आहे. यात, क्रुझ क्षेपणास्त्रे ईशांन्येकडील शहर मुनचोनजवळील भागातून सकाळी जवळपास 7 वाजण्याच्या सुमारास सोडण्यात आले, असे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ (जेसीएस) यांनी म्हटले आहे.
जेसीएस म्हणाले, क्षेपणास्त्रे लाँच करण्याबरोबरच, उत्तर कोरियाने पूर्वेकडील शहर वॉनसनवर अनेक सुखोई-व्हॅरिएंट फायटर जेटदेखील उडवले आणि अनेक ‘अँटी-ग्राउंड’ क्षेपणास्त्रांचा पूर्वेकडील समुद्राकडे मारा केला. मात्र, या परीक्षणावेळी किम जोंग उपस्थित होते की नाही. हे अद्याप कळू शकलेले नही. विशेष म्हणजे या परीक्षणाचे टीव्ही ब्रॉडकास्ट करण्यात आले, जे देशभरात बघितले गेले.
किम इल-सुंग, हे उत्तर कोरीयाचे राष्ट्रीय संस्थापक आणि किम जोंग-उन यांचे अजोबा होते. त्यांच्या 108व्या जयंती निमित्त हे परीक्षण करण्यात आले.