नोकियाचा तो फोन नव्या रूपात दाखल
By Admin | Updated: February 26, 2017 22:52 IST2017-02-26T22:52:41+5:302017-02-26T22:52:41+5:30
एकेकाळी कमालीचा लोकप्रिय ठरलेला नोकिया 3310 हा मोबाईल फोन आता नव्या बदललेल्या

नोकियाचा तो फोन नव्या रूपात दाखल
>ऑनलाइन लोकमत
बार्सिलोना, दि. 26 - एकेकाळी कमालीचा लोकप्रिय ठरलेला नोकिया 3310 हा मोबाईल फोन आता नव्या बदललेल्या रूपासह दाखल झाला आहे. बार्सिलोना येथे सुरू असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नोकियाने आपल्या या एकेकाळच्या लोकप्रिय फोनच्या नव्या अवताराचे अनावरण केले.
या फोनसोबत 22 तासांचा टॉकटाइम आणि एका महिन्याचा स्टँडबाय टाइम देण्याची घोषणा नोकियाने केली आहे. तसेच या फोनची किंमत अवघी 49 युरो म्हणजेच 3400 एवढी राहणार आहे. नोकियाच्या या फोनसोबतच इतर कंपन्यांच्या फोनचेही अनावरण करण्यात आले.