जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:49 IST2025-10-07T17:48:01+5:302025-10-07T17:49:48+5:30
Nobel Prize 2025: इलेक्ट्रिक सर्किटमधील मॅक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनलिंग आणि ऊर्जा क्वांटायझेशनचा शोध लावल्याबद्दल सन्मान!

जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
Nobel Prize 2025: जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट, आणि जॉन एम. मार्टिनिस या तीन प्रख्यात वैज्ञानिकांना 2025 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने सांगितले की, “इलेक्ट्रिक सर्किटमधील मॅक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनलिंग आणि ऊर्जा क्वांटायझेशनचा शोध” लावल्याबद्दल या शास्त्रज्ञांना हा सन्मान दिला जात आहे.
या तिघांनी असा प्रयोग केला, ज्यातून क्वांटम प्रभाव (Quantum Effects) एका मोठ्या, हातात धरण्याजोग्या इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये प्रत्यक्ष दिसू शकतात हे सिद्ध झाले. ही संकल्पना भविष्यातील क्वांटम संगणक (Quantum Computing), क्रिप्टोग्राफी आणि अत्यंत संवेदनशील सेन्सर्स यांसारख्या तंत्रज्ञानासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
BREAKING NEWS
— The Nobel Prize (@NobelPrize) October 7, 2025
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2025 #NobelPrize in Physics to John Clarke, Michel H. Devoret and John M. Martinis “for the discovery of macroscopic quantum mechanical tunnelling and energy quantisation in an electric circuit.” pic.twitter.com/XkDUKWbHpz
क्वांटम तंत्रज्ञानातील नवे पर्व
या संशोधनाने सिद्ध केले की क्वांटम यांत्रिकीचे (Quantum Mechanics) नियम केवळ अणु पातळीपुरते मर्यादित नाहीत, तर ते मोठ्या मॅक्रोस्कोपिक प्रणालींमध्येही लागू होऊ शकतात. यामुळे सुपरकंडक्टिंग क्विबिट्स, क्वांटम संगणक आणि ऊर्जेच्या सूक्ष्म नियंत्रणाच्या नव्या पद्धती विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हीच ती तंत्रक्रांती आहे, जी आगामी दशकात कृत्रिम बुद्धिमत्ता, एन्क्रिप्शन आणि विज्ञान संशोधन यांची दिशा बदलू शकते.
गणितासाठी नोबेल पुरस्कार का दिला जात नाही? जाणून घ्या कारण...
2024 मध्ये AI निर्मात्यांचा सन्मान
गेल्या वर्षी भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जॉन जे. होपफिल्ड आणि जेफ्री हिंटन या दोन वैज्ञानिकांना देण्यात आला होता. त्यांनी आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स (Artificial Neural Networks) च्या माध्यमातून मशीन लर्निंग सुलभ करणारे सिद्धांत मांडले. होपफिल्ड यांनी Associative Memory System तयार केले, जे डेटातील नमुने (patterns) साठवते आणि पुन्हा तयार करू शकते. तर, हिंटन यांनी Boltzmann Machines सुधारीत करुन आधुनिक डीप लर्निंगची पायाभरणी केली. या दोघांच्या कार्यामुळेच आजच्या AI क्रांती झाली आहे.