इथियोपियाचे पंतप्रधान अहमद अली यांना मिळणार शांततेचा नोबेल पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 16:15 IST2019-10-11T16:11:32+5:302019-10-11T16:15:54+5:30

जगातला सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्कार इथियोपियाचे पंतप्रधान अहमद अली यांना जाहीर झाला आहे.

nobel peace prize 2019 to be announce ethiopian prime minister | इथियोपियाचे पंतप्रधान अहमद अली यांना मिळणार शांततेचा नोबेल पुरस्कार

इथियोपियाचे पंतप्रधान अहमद अली यांना मिळणार शांततेचा नोबेल पुरस्कार

ओस्लोः जगातला सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्कार इथियोपियाचे पंतप्रधान अहमद अली यांना जाहीर झाला आहे. इथियोपियाचे पंतप्रधान अहमद अली यांनी शेजारील राष्ट्र असलेल्या एरिट्रियाबरोबरचा सीमावाद सोडण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. दोन्ही देशांमध्ये शांती नांदण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

नोबेल पारितोषिक समितीच्या विधानानुसार, अहमद अली यांनी एरिट्रियाबरोबरचा वाद सोडवण्यासाठी अनेक स्तरावर चर्चा केली होती. शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा नॉर्वेच्या संसदेकडून निवड करण्यात आलेल्या पाच सदस्यांची समिती करते. लष्कराचे माजी अधिकारी राहिलेल्या अहमद अली यांनी देशात अनेक सुधारणा केल्या आहेत. इथियोपियाचे शेजारील राष्ट्र असलेल्या एरिट्रियाबरोबर गेल्या 20 वर्षांपासून सीमावाद सुरू होता.

तो वाद सोडवण्यासाठी अहमद अली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यासाठीच त्यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. इथियोपियाकडून पूर्व आणि उत्तर पूर्व आफ्रिकी क्षेत्रात शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. अहमद अलींनी देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि राजकीय सुधारणा केल्या आहेत. एरिट्रियाचे राष्ट्रपती इसाइआस अफवेरकीबरोबर अहमद अली यांनी शांती करारासाठी वेगानं काम केलं, त्यामुळेच दोन्ही देशांतला हा वाद संपुष्टात आला आहे. 

आईच्या आत्महत्येवरून पुस्तक लिहिलं, साहित्याचं नोबेल मिळालं!

यंदाच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. साहित्य क्षेत्रातील नोबेल जाहीर झाला आहे. 2018 या वर्षासाठी साहित्याचा नोबेल पुरस्कार पोलंडच्या लेखिका ओल्गा तोकारजुक यांना जाहीर झाला आहे. तर 2019चा साहित्याचा नोबेल पुरस्कार लेखक पीटर हँडके यांना जाहीर झाला आहे. नोबेल पुरस्कार समितीने साहित्य क्षेत्रातील पुरस्कारासंबंधी गुरुवारी (10 ऑक्टोबर) ट्विट करून माहिती दिली आहे. ओल्गा तोकारजुक या पोलंडच्या लेखिका आणि कार्यकर्त्या आहेत. 2018 मध्ये ओल्गा यांना त्यांच्या फ्लाइट्स या कादंबरीसाठी 'मॅन बुकर इंटरनॅशनल प्राइज' ने सन्मानित करण्यात आलं आहे. 2018 या वर्षासाठी साहित्याचा नोबेल पुरस्कार ओल्गा यांना जाहीर झाला आहे. तसेच साहित्यिक आणि अनुवादक पीटर हँडके यांना 2019 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. 

Web Title: nobel peace prize 2019 to be announce ethiopian prime minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.