शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

‘लो कार्बन एलईडी’साठी जपानी संशोधकांना नोबेल

By admin | Updated: October 8, 2014 02:51 IST

इसामु अकासाकी , हिरोशी अमानो व शुजी नाकामुरा या तीन शास्त्रज्ञांना कमी कार्बनच्या एलईडी दिव्याच्या संशोधनासाठी यावर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे

स्टॉकहोम : इसामु अकासाकी , हिरोशी अमानो व शुजी नाकामुरा या तीन शास्त्रज्ञांना कमी कार्बनच्या एलईडी दिव्याच्या संशोधनासाठी यावर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. पर्यावरणाला लाभदायक ठरणाऱ्या उर्जेच्या नव्या स्त्रोताच्या संशोधनासाठी त्यांची निवड करण्यात आली. हा शोध लावणारे तिघेही संशोधक जपानी आहेत. त्यांचा हा शोध जागतिक तापमानवाढीच्या विरोधातील लढ्यात उपकारक ठरणार आहे. किमतीच्या बाबतीत हा दिवा गरीबांना परवडेल इतका किफायतशीर आहे. हे तीनही संशोधक सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्यांच्या संशोधनातून सिद्ध झालेला हा एलईडी (लाईट एमिटिंग डिओड) दिवा निळा प्रकाश देतो. हे संशोधन क्रांतीकारी असल्याचे पुरस्काराची घोषणा करणाऱ्या परीक्षकांनी म्हटले आहे. २० व्या शतकात आधुनिक लाईट बल्ब आले, २१ वे शतक एलईडी लॅम्पचे आहे, असही परीक्षकांनी म्हटलेआहे. जगभरात जी ऊर्जा वापरली जाते, त्यापैकी १९ टक्के ऊर्जा प्रकाशासाठी वापरली जाते. त्या ऊर्जेत बचत करण्याचे मोलाचे काम या संशोधनामुळे शक्य होणार असल्याचाही परीक्षकांनी आवर्जून उल्लेख केला आहे. या तीन संशोधकांनी १९९०च्या दशकाच्या पूर्वार्धात सेमीकंडक्टरमधून निळे प्रकाशकिरण तयार करण्यात यश आले होते. प्रकाशाच्या तंत्रज्ञानातील हे मूलभूत बदल ठरले असे ज्युरींचे म्हणणे आहे. लाल व निळे प्रकाश फार पूर्वीपासून होते, पण निळ्या प्रकाशाअभावी पांढरे दिवे तयार करणे शक्य नव्हते. निळा एलईडी तयार करणे हे तीन दशकांसाठी आव्हान होते, त्यात या तीन शास्त्रज्ञांना यश मिळाले. एलईडी लॅम्प दीर्घकाळ टिकणारे असून, आधीच्या प्रकाशस्त्रोतांना हा सक्षम पर्याय मिळणार आहे. थॉमस एडीसनने १९ व्या शतकात शोध लावलेल्या व आजही वापरात असलेल्या वीजेच्या दिव्यांच्या तुलनेत एलईडी लॅम्पसाठी फार कमी उर्जा लागेल व ते दीर्घकाळ टिकतील. सौर उर्जेवरही हे दिवे चालू शकतात, जगातील वीज उपलब्ध नसणाऱ्या १५ कोटी लोकांसाठी हे वरदान ठरणारआहे.गेल्यावर्षी गॉड पार्टिकल (इश्वरी कण) चा शोध लावणाऱ्या पीटर हिग्ज (इंग्लंड) व फ्रँकोईस इंग्लेट (बेल्जियम) या शास्त्रज्ञाना भौतिकशास्त्राचे नोबेल मिळाले होते. गॉड पार्टिकल (हिग्ज बोसॉन) हा अणु इतर अणुंना घनता देतो. परंपरेनुसार स्वीडनमधील स्टॉकहोम येथे आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिदिनी, १० डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. ८० लाख क्रोनर (११लाख अमेरिकी डॉलर) ही पुरस्काराची रक्कम तीन विजेत्यांत विभागून दिली जाणार आहे. (वृत्तसंस्था)