शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

सॅलरी नाही, कारची चावी ड्रॉव्हरमध्ये आहे..; तालिबानला कंटाळलेल्या चीनमधील अफगाण राजदूताचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 16:44 IST

तालिबानने परदेशातील अफगाण राजदूतांना पैसे पाठवणे बंद केले आहे.

अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबान (Taliban) राजवट आल्यापासून देशाची अर्थव्यवस्था (Economy) खराब झाली आहे. अमेरिकेने (America) अफगाणिस्तानचे अब्जावधी डॉलर्स रोखून धरले असून तालिबान आता अनेकांकडे पैशांसाठी हात पसरत आहे. दरम्यान, तालिबानने परदेशातील अफगाण राजदूतांना पैसे पाठवणे बंद केले आहे. यांची नियुक्ती अशरफ गनी यांच्या कार्यकाळादरम्यान झाली होती. तालिबाननं पैसे पाठवणे बंद केल्याने त्यांनाही आता आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे.

या सर्व प्रकरणानंतर चीनमधील अफगाणिस्तानचे राजदूत जाविद अहमद कइम यांनी पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा सोशल मीडियावर (Social Media) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अफगाणिस्तानच्या राजदूताने आपल्या पत्रात खुलासा केला आहे की, त्यांच्या कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून पगार दिला जात नव्हता. फोन कॉलला उत्तर देणारा केवळ एक रिसेप्शनिस्ट शिल्लक आहे.  ६ महिन्यांपासून वेतन नाही'गेल्या ६ महिन्यांपासून आम्हाला काबूलमधून कोणताही पगार मिळाला नाही. त्यामुळे आम्ही आर्थिक संकट सोडवण्यासाठी एक समिती स्थापन केली होती,' असं त्यांनी ट्विटरद्वारे म्हटलं होतं. १ जानेवारी रोजी अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला त्यांनी यासंदर्भातील पत्र पाठवले होते, मात्र सोमवारी ट्वीट करून ते त्यांनी जगासमोर आणले. राजदूत जाविद यांनी त्यांच्या उत्तराधिकारींसाठी काही पैसे ठेवले आहेत. ते म्हणाले, 'आज १ जानेवारी २०२२ पर्यंत बँक खात्यात १ लाख डॉलर शिल्लक आहेत.' पुढे कुठे जाणार हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. 

अनेक अफगाण दुतावासात हीच परिस्थितीजाविदच्या पत्राद्वारे त्यांनी दूतावासाच्या ५ गाड्यांच्या चाव्या आपल्या कार्यालयात सोडल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, सर्वजण निघून गेल्यानंतर लोकांच्या फोन कॉलला उत्तर देण्यासाठी त्यांनी स्थानिक कर्मचाऱ्याचीही नियुक्ती केली आहे. जगभरातील बहुतेक अफगाण दूतावासांमध्येही अशीच परिस्थिती आहे. हे दूतावास आजही पूर्वीच्या अशरफ गनी सरकारशी एकनिष्ठ असलेले लोक चालवतात. तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यानंतर अनेक अफगाण अधिकारी चीन सोडून गेले. त्यांनी आपल्या राजीनाम्याला “सन्माननीय जबाबदारीचा अंत” म्हटल्याचं जाविद म्हणाले. "माझा विश्वास आहे की जेव्हा नवी व्यक्ती त्या ठिकाणी येईल तेव्हा तिकडे जुन्या अधिकाऱ्यांपैकी कोणीही अधिकारी शिल्लक राहणार नाही," असे त्यांनी म्हटले आहे.

तालिबानकडून प्रतिक्रिया नाहीजाविद यांच्या जागी तालिबानकडून कोणाला राजदूत म्हणून नियुक्त केले जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या राजीनाम्यावर तालिबानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. नोव्हेंबर २०१९ मध्ये जाविद यांची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी तालिबानच्या शिष्टमंडळाच्या चीन भेटीवर चिंताही व्यक्त केली होती. त्याच्याच काही आठवड्यांनंतर तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला.

 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानchinaचीन