शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

पाकिस्तानला जबरदस्त दणका; सौदी अरेबियानं कर्ज, तेल पुरवठा रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 06:50 IST

काश्मीरप्रश्नी केलेला थयथयाट भोवला; भारतासाठी झाली अनुकूल स्थिती

रियाध : पाकिस्तानला यापुढे कर्ज तसेच तेलाचा पुरवठा करणार नसल्याचे सौदी अरेबियाने जाहीर केले आहे. अशा रीतीने या दोन देशांतील घनिष्ठ मैत्री आता संपुष्टात आली आहे. काश्मीर प्रश्नावर भारताविरोधात भूमिका न घेतल्याबद्दल सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखालील ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी)ला पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी निर्वाणीचा इशारा दिला होता.यासंदर्भात मिडल इस्ट मॉनिटर या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, सौदी अरेबियाला पाकिस्तानने १ अब्ज डॉलर देणे बाकी आहे. सौदी अरेबियाने पाकिस्तानसाठी २०१८ साली ६.२ अब्ज डॉलरची मदत देण्याचे ठरविले होते. त्यातील ३ अब्ज रुपये कर्जरुपाने व ३.२ अब्ज डॉलर तेल पुरवठ्याच्या स्वरुपात देण्यात येणार होते. सौदी अरेबियाचे युवराज मुहम्मद बिन सलमान हे गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले असताना, मदतीसंदभार्तील या करारावर स्वाक्षºया झाल्या होत्या.पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमुद कुरेशी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, काश्मीरबाबत भारताविरोधात भूमिका घेणे ओआयसी संघटनेला व सौदी अरेबियाला जमणार नसेल तर पाकिस्तान सर्व इस्लामी देशांची स्वतंत्रपणे बैठक बोलाविण्याचा विचार करत आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्याचा भारताने निर्णय घेतला. त्यानंतर या मुद्द्यावर ओआयसी संघटनेच्या सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक बोलाविण्यात यावी अशी मागणी सातत्याने पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. पण ती या संघटनेने अद्याप मनावर घेतलेली नाही. काश्मीरप्रश्नी भारताविरोधात भूमिका घ्यायची का याबाबत इस्लामी देशांमध्येच मतभेद आहेत व पाकिस्तानचा आवाज फारच दुबळा आहे अशी खंत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी २२ मे रोजी व्यक्त केली होती.मालदीवने दिला भारताला पाठिंबाकाश्मीरबाबत पाकिस्तानच्या भूमिकेला मालदीवने विरोध केला आहे. त्या देशाच्या प्रतिनिधी तिल्मिझा हुसेन यांनी सांगितले की, इस्लामी विचारसरणीची ढाल करून पाकिस्तान भारताविरोधात जे डावपेच लढवत आहे ते चुकीचे आहे. त्यामुळे दक्षिण आशियातील धार्मिक सलोख्याला तडा जाईल.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानCrude Oilखनिज तेलsaudi arabiaसौदी अरेबिया