कथित कैलासा देशाच्या नित्यानंदचा नवा कारनामा; 'या' देशावर कब्जा करण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 15:27 IST2025-04-04T15:27:03+5:302025-04-04T15:27:35+5:30

आता नित्यानंद याच्या काल्पनिक देश कैलासावर बोलीविया विरोधात षडयंत्र रचत असल्याचं समोर आले आहे

Nithyananda fictional country, Kailasa, were deported from Bolivia for allegedly attempting to seize land belonging to indigenous communities | कथित कैलासा देशाच्या नित्यानंदचा नवा कारनामा; 'या' देशावर कब्जा करण्याची तयारी

कथित कैलासा देशाच्या नित्यानंदचा नवा कारनामा; 'या' देशावर कब्जा करण्याची तयारी

सुकरे - मुलांचं अपहरण आणि लैंगिक शोषणातील आरोपी स्वघोषित धर्मगुरू नित्यानंदचा आणखी एक कारनामा चर्चेत आला आहे. नित्यानंदचा हा प्रताप पाहून एक लॅटिन अमेरिकन देशाचं सरकार हादरलं आहे. नित्यानंद स्वामीच्या कथित हिंदू राष्ट्र कैलासानं या देशावर कब्जा करण्याची योजना बनवली आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टमधून हा खुलासा समोर आला आहे. त्यात नित्यानंदशी निगडीत लोकांनी बोलीवियात एक मोठी योजना बनवली होती असं सांगण्यात येत आहे.

कोण आहे नित्यानंद?

गंभीर आरोपात नाव आल्यानंतर स्वयंभू धर्मगुरू नित्यानंद २०१९ साली भारत सोडून पळाला तेव्हापासून तो कधीच परतला नाही. भारतातून पळाल्यानंतर त्याने कैलासा नावाचं नवीन राष्ट्र बनवल्याचा दावा केला. हे राष्ट्र जगातील एकमेव हिंदू राष्ट्र असून त्याचे पासपोर्ट आणि संविधानही आहे असं नित्यानंद दावा करतो. इतकेच नाही तर या कथाकथित देशाचे प्रतिनिधित्व करणारे २०२३ साली संयुक्त राष्ट्राच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते आणि जगातील अनेक नेत्यांसोबत त्यांनी फोटो काढले.

'बोलीविया' कब्जा करण्याचा आरोप

आता नित्यानंद याच्या काल्पनिक देश कैलासावर बोलीविया विरोधात षडयंत्र रचत असल्याचं समोर आले आहे. रिपोर्टनुसार, बोलीविया येथील अधिकाऱ्यांनी कैलासा निगडीत २० जणांना अटक केली आहे. या लोकांवर अमेजनचा मोठा भाग १ हजार वर्षासाठी लीजवर घेण्यासाठी स्थानिक जाती समुदायाची भेट घेतली. त्यांच्यावर जमीन तस्करीचा आरोप लावण्यात आला आहे. ही माहिती समोर येताच बोलीविया सरकारने कराराला अमान्य घोषित केले. कैलासाचे लोक फक्त बोलीविया देशातच नव्हे तर भारत, अमेरिका, स्वीडन, चीनमध्ये गेले आहेत. याबाबत बोलीविया सरकारच्या परराष्ट्र खात्याने निवेदन जारी करत त्यांचा कैलासाशी कुठलाही राजनैतिक संबंध नसल्याचं स्पष्ट केले आहे.

स्वदेशी समुदायाची जमीन लीजवर घेतली

बोलीविया सरकारने म्हटलं की, कैलासाच्या सदस्यांनी कथितपणे त्यांच्या देशातील स्वदेशी समुदायाच्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. हे सदस्य पर्यटक म्हणून देशात आले होते. ते वेगवेगळ्या वेळी देशात आले. ३ स्वदेशी समुदायांनी जवळपास ४.८ लाख हेक्टर क्षेत्र जाहीरपणे कैलासासोबत सामंजस्य करार केला होता. नवी दिल्ली शहराच्या ३ पट जास्त जमीन बळकावण्याचा प्रयत्न होता. २ लाख डॉलर वार्षिक भरपाई देत २५ वर्षाच्या करारावर सहमती झाली होती. दरम्यान, नित्यानंदच्या कैलासा देशाने स्वदेशी समुदायासोबत १ हजार वर्षासाठी करार केले. त्या करारानुसार, या जमिनीवरील सर्व संपत्तीवर पूर्ण अधिकार आणि नियंत्रण त्यांना राहील. कैलासा प्रतिवर्ष त्यासाठी १ लाख ८ हजार डॉलर भरपाई देईल असं ठरले होते. 

Web Title: Nithyananda fictional country, Kailasa, were deported from Bolivia for allegedly attempting to seize land belonging to indigenous communities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.