नऊ वर्षांच्या भारतीय मुलीची न्यूयॉर्कमध्ये हत्या

By Admin | Updated: August 22, 2016 05:01 IST2016-08-22T05:01:53+5:302016-08-22T05:01:53+5:30

क्विन्स भागात राहायला आलेल्या आशादीप नावाच्या नऊ वर्षांच्या भारतीय मुलीचा मृतदेह तिच्या घरात गूढ परिस्थितीत आढळला

Nine year old Indian girl murdered in New York | नऊ वर्षांच्या भारतीय मुलीची न्यूयॉर्कमध्ये हत्या

नऊ वर्षांच्या भारतीय मुलीची न्यूयॉर्कमध्ये हत्या


न्यूयॉर्क : तीन महिन्यांपूर्वी येथील क्विन्स भागात राहायला आलेल्या आशादीप नावाच्या नऊ वर्षांच्या भारतीय मुलीचा मृतदेह तिच्या घरात गूढ परिस्थितीत आढळला आहे. या प्रकरणी तिची सावत्र आई अर्जुन समधी पारदस (५५) हिच्यावर खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
क्विन्स भागातील अपार्टमेंटमध्ये तिचे वडील सुखजिंदर सिंग व सावत्र आई अजुर्न सिंग पारदस यांच्यासोबत राहात होती. या अपार्टमेंटमध्ये आणखी एक जोडपे राहायला आहे. आशादीप बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळली. तिच्या अंगावर मुक्या माराच्या खूण आढळल्या. तिचा शुक्रवारी गळा आवळून खून केल्याचा आरोप पारदस हिच्यावर ठेवण्यात आला आहे, असे न्यूयॉर्क पोस्टने सूत्रांचा हवाल्याने वृत्त दिले.
आशादीप पारदस हिच्यासोबत न्हाणीघरात गेली व एकटीच परत येऊन इमारतीतून निघून गेली, असे घरात राहणाऱ्याने सांगितले. आशादीप आंघोळ करीत होती परंतु ती न्हाणीघरातून बाहेर न आल्याचे घरातील व्यक्तिने बघितले तेव्हा आशादीप पाणी नसलेल्या बाथटबमध्ये निर्जीव अवस्थेत आढळली. तिचा मृतदेह आढळला त्यावेळी पारदस तेथे कुठेही दिसली नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: Nine year old Indian girl murdered in New York