न्यूझीलंडच्या PM जॅसिंडांना पत्रकार परिषदेत विचारला गेला सेक्ससंदर्भात प्रश्न; आधी थबकल्या, मग हसून दिलं असं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 15:11 IST2021-09-10T15:10:12+5:302021-09-10T15:11:36+5:30
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी नुकतीच कोरोनासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी विचारल्या गेलेल्या एका प्रश्नादरम्यान, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, असे काही बदलले, की त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.

न्यूझीलंडच्या PM जॅसिंडांना पत्रकार परिषदेत विचारला गेला सेक्ससंदर्भात प्रश्न; आधी थबकल्या, मग हसून दिलं असं उत्तर
कोरोना महामारीचा जगातील अनेक देशांवर वाईट परिणाम झाला. अशा परिस्थितीत, न्यूझीलंडच्यापंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी या महामारीचा ज्या पद्धतीने सामना केला, त्यासाठी त्याच्या प्रशासनाचे जबरदस्त कौतुक होत आहे. त्यांनी नुकतीच कोरोनासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी विचारल्या गेलेल्या एका प्रश्नादरम्यान, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, असे काही बदलले, की त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. (New zealand reporter asked question to pm jacinda ardern face expression goes viral)
पत्रकाराने विचारला असा प्रश्न -
न्यूझीलंडच्यापंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न आणि आरोग्य महासंचालक डॉ. अश्ले ब्लूमफील्ड कोविड -19 संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देत होते. या दरम्यान एका पत्रकाराने त्याना विचारले, ऑकलंड रुग्णालयातील एक रुग्ण आणि त्याला भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीवर लैंगिक संबंधाचा आरोप आहे. सध्य स्थितीत, याला हाय-रिस्क कृत्य म्हटले जाऊ शकते का?
PM Jacinda Ardern says sexual relations, regardless of Covid status, shouldn’t “generally be part of [hospital] visiting hours.” Ashley Bloomfield: “It’s a high risk activity, potentially.” pic.twitter.com/VeRVXg7QjU
— Aaron Dahmen (@dahmenaaron) September 9, 2021
पंतप्रधानांचे एक्सप्रेशन्स व्हायरल -
हा प्रश्न ऐकताच जॅसिंडा यांच्या चेहऱ्यावरील हावभाव प्रचंड बदलले आणि त्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. या प्रश्नाचे उत्तर देताना, डॉ ब्लूमफील्ड म्हणाले, मला वाटते, की हे एक अत्यंत हाय-रिस्क कृत्य असू शकते. मात्र, मला या घटनेची माहिती नाही. यानंतर, पीएम आर्डर्न यांनी उत्तर दिले, त्या म्हणाल्या, मला वाटते की जरी कोरोनाच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले गेले तरी रुग्णालयात भेटीच्या वेळेस अशी कोणतीही क्रिया करणे चूकच आहे.