शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

New York State Buffalo Shooting: न्यूयॉर्कच्या सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार, 10 कृष्णवर्णीयांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 09:16 IST

New York State Buffalo Shooting: या घटनेनंतर 18 वर्षीय हल्लेखोराने पोलिसासमोर आत्मसमर्पण केले आहे.

न्यू यॉर्क: न्यूयॉर्कमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बफेलोच्या एका सुपरमार्केटमध्ये शनिवारी दुपारी 13-14 जणांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी हल्लेखोर व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. 

कृष्णवर्णीयांवर हल्लापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करण्यापूर्वी हल्लेखोराने घटना ऑनलाइन दाखवली. सध्या पोलिसांनी या 18 वर्षीय हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. त्याचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, ज्या भागात ही गोळीबाराची घटना घडली त्या भागात बहुतांश कृष्णवर्णीय राहतात. बळी पडलेले बहुतांश लोक कृष्णवर्णीय आहेत. बफेलोचे पोलिस आयुक्त ग्रामाग्लिया यांनी सांगितले की 13 जणांना गोळ्या लागल्या, त्यापैकी 10 जण मरण पावले. बाकीच्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

हल्ल्यानंतर आत्मसमर्पण या घटनेत सुपरमार्केटमध्ये काम करणारे 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने संशयितावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. पोलिसांनी सांगितले की, संशयिताकडे शक्तिशाली रायफल होती आणि त्याने हेल्मेटही घातले होते. हल्ल्यानंतर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाFiringगोळीबार