पतीने गिफ्ट केलं होतं होम - मसाज, मसाजवाल्याने घरी येऊन केला पत्नीवर रेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 16:39 IST2022-08-08T16:38:10+5:302022-08-08T16:39:26+5:30

Crime News : मसाजची बुकिंग महिलेच्या पतीने तिच्यासाठी केली होती. तो स्वत: त्यावेळी शहरातून बाहेर गेलेला होता. ब्रुकलिन सुप्रीम कोर्टात दाखल या केसनुसार, पतीने पत्नीला दिलेलं गिफ्ट तिच्यासाठी एका वाईट स्वप्नासारखं ठरलं.

New York : Husband booked home massage woman claims she was raped | पतीने गिफ्ट केलं होतं होम - मसाज, मसाजवाल्याने घरी येऊन केला पत्नीवर रेप

पतीने गिफ्ट केलं होतं होम - मसाज, मसाजवाल्याने घरी येऊन केला पत्नीवर रेप

Crime News : एका महिलेने आरोप केला की, मसाज करण्यासाठी तिच्या घरी आलेल्या व्यक्तीने तिच्यावर रेप केला. झालं असं की, महिलेच्या पतीने एका अ‍ॅपच्या माध्यमातून पत्नीसाठी होम -मसाजचं बुकिंग केलं होतं. आता महिलेने अ‍ॅप विरोधात केस दाखल केली आहे. कोर्टात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, चौकशी दरम्यान समोर आलं की, मसाजसाठी आलेल्या व्यक्तीने आधीही एका महिलेसोबत रेप केला होता.

ही घटना अमेरिकेच्या (America) न्यूयॉर्कमधील (New York) आहे. महिलेने गेल्या आठवड्यात एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की, तिला या गोष्टीची भीती वाटते की, तो नराधम पुन्हा तिच्या घरी येईल. त्यामुळे ती तिथून शिफ्ट होण्याचा विचार करत आहे. महिलेने आपल्या व्हिडीओत बाइटमध्ये सांगितलं की, त्याला माहीत आहे की, मी कुठे राहते. त्यामुळे तो पुन्हा घरी येण्याची भीती वाटत राहते.

मसाजची बुकिंग महिलेच्या पतीने तिच्यासाठी केली होती. तो स्वत: त्यावेळी शहरातून बाहेर गेलेला होता. ब्रुकलिन सुप्रीम कोर्टात दाखल या केसनुसार, पतीने पत्नीला दिलेलं गिफ्ट तिच्यासाठी एका वाईट स्वप्नासारखं ठरलं.

कोर्टात दाखल केसमध्ये सांगण्यात आलं की, मसाज करणाऱ्या व्यक्तीने त्याचं एक फेक नाव हर्नांडो गिराल्डो ठेवलं होतं. हार्नांडोला याआधीही एका महिला ग्राहकाचं लैंगिक शोषण करण्याच्या आरोपात अटक झाली होती. कोर्टात दाखल केसमध्ये महिलेने अ‍ॅप सेवेवर आरोप केला की, कंपनीने हर्नांडोला हायर करण्याच्या नियमांचं पालन केलं नाही. रिपोर्टनुसार Soothe ने एका बाहेरील कंपनी Evident ला कर्मचाऱ्यांचं बॅकग्राउंड चेक्ससाठी एनालिस्ट ठेवले आहेत. 

महिेलेने Soothe आणि Evident दोन्ही कंपनीवर केस दाखल केली आहे. महिलेचा आरोप आहे की, कंपनीने हर्नांडोचं बॅकग्राउंड चांगल्या प्रकारे चेक केलं नव्हतं आणि कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे तिच्यावर रेप झाला. सध्या या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. 

Web Title: New York : Husband booked home massage woman claims she was raped