ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 22:49 IST2025-12-12T22:49:02+5:302025-12-12T22:49:28+5:30

हाऊस ओव्हरसाईट कमिटीमधील डेमोक्रॅट्सनी शुक्रवारी लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनचे १९ नवीन फोटो प्रसिद्ध केले.

New photos of Donald Trump Bill Gates Bill Clinton with Jeffrey Epstein released | ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश

ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश

Jeffrey Epstein Files: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स आणि माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यासह अनेक बड्या व्यक्तींचे लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्यासोबतचे नवीन फोटो अमेरिकेतील हाऊस ओव्हरसाईट कमिटीच्या डेमोक्रॅट सदस्यांनी प्रसिद्ध केले आहेत. एपस्टीनच्या संपत्तीतून मिळालेले हे १९ फोटो जारी करण्यात आले असून, यामुळे अमेरिकेच्या राजकारणात आणि उच्चभ्रू वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

फोटोंमध्ये काय आहे?

एका फोटोमध्ये ट्रम्प सहा महिलांसोबत उभे आहेत, ज्यांचे चेहरे ब्लर केलेले आहेत. अन्य एका फोटोत ट्रम्प, एपस्टीन आणि एका महिलेसोबत दिसत आहेत. तिसऱ्या एका फोटोत ट्रम्प एका महिलेशी बोलताना दिसत असून बाजूला एपस्टीन उभे आहेत. एका फोटोत ट्रम्प यांच्या चेहऱ्याचे चित्र असलेले 'नॉव्हेल्टी कंडोम' एका भांड्यात ठेवलेले दिसत आहे. त्यावर 'ट्रम्प कंडोम' आणि त्याची किंमत साडेचार डॉलर लिहिलेली आहे.

एका फोटोत माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन हे जेफ्री एपस्टीन आणि त्याची सहकारी घिसलीन मॅक्सवेल यांच्यासोबत दिसत आहेत. या फोटोवर क्लिंटन यांची स्वाक्षरी देखील आहे. इतर फोटोंमध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू, तसेच हार्वर्डचे माजी अध्यक्ष लॅरी समर्स आणि वकील एलन डर्शोविट्ज यांसारख्या प्रमुख व्यक्ती एपस्टीनसोबत दिसत आहेत. डेमोक्रॅट कमिटीने स्पष्ट केले आहे की, यापैकी कोणताही फोटो शोषण किंवा अल्पवयीन मुलींशी संबंध दर्शवत नाही.

कोण होता जेफ्री एपस्टीन?

जेफ्री एपस्टीन हा न्यूयॉर्क शहरातील अब्जाधीश फायनान्सर होता. त्याचे अमेरिकेतील उच्चभ्रू राजकारणी आणि सेलिब्रिटींशी घनिष्ठ संबंध होते. २००५ मध्ये त्याच्यावर नाबालिग मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला. २००८ मध्ये त्याला नाबालिग मुलीसोबत लैंगिक संबंधांची मागणी केल्याबद्दल दोषी ठरवून १३ महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. २०१९ मध्ये त्याला सेक्स ट्रॅफिकिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, मात्र खटला सुरू होण्यापूर्वीच त्याने तुरुंगात आत्महत्या केली. त्याची दीर्घकाळची सहकारी घिसलीन मॅक्सवेल हिला एपस्टीनला सेक्स ट्रॅफिकिंगमध्ये मदत केल्याबद्दल २०२१ मध्ये दोषी ठरवून २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ट्रम्प आणि एपस्टीन यांचा संबंध

डोनाल्ड ट्रम्प आणि एपस्टीन हे १९८० ते २००० या काळात एकमेकांचे मित्र होते आणि ते एकाच उच्चभ्रू सामाजिक वर्तुळात वावरत होते. २००४ मध्ये मालमत्तेच्या वादातून त्यांचे संबंध बिघडले. अनेक कोर्टाच्या कागदपत्रांमध्ये ट्रम्प यांचा उल्लेख आला असला, तरी कोणत्याही गैरकृत्यासाठी किंवा गुन्ह्यासाठी ते दोषी असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. २०२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ९५० पानांच्या कोर्ट रेकॉर्डमध्येही ट्रम्प यांना कोणत्याही गैरकृत्यासाठी दोषी ठरवले गेले नाही.

डेमोक्रॅट कमिटीच्या सदस्य, सीनेटर रॉबर्ट गार्सिया यांनी हे फोटो जारी करताना, व्हाइट हाऊसने या प्रकरणावर टाकलेला पडदा हटवावा अशी मागणी केली आहे. "जेफ्री एपस्टीन आणि त्याच्या शक्तिशाली मित्रांचे बळी ठरलेल्या पीडितांना न्याय मिळवून देण्याची वेळ आली आहे. हे त्रासदायक फोटो एपस्टीनचे जगातील सर्वात शक्तिशाली लोकांशी असलेल्या संबंधांबद्दल अधिक प्रश्न निर्माण करतात," असे गार्सिया यांनी म्हटले आहे. त्यांनी न्याय विभागाने तातडीने सर्व कागदपत्रे सार्वजनिक करावीत अशी मागणी केली आहे.

Web Title : एपस्टीन की 'ब्लैक' डायरी में ट्रम्प, क्लिंटन, गेट्स की तस्वीरें उजागर।

Web Summary : एपस्टीन के साथ ट्रम्प, क्लिंटन, गेट्स की तस्वीरें जारी, विवाद छिड़ा। दस्तावेजों से दोस्ती का खुलासा, शक्तिशाली संबंधों और पीड़ितों के लिए न्याय पर सवाल उठे।

Web Title : Epstein's 'black' diary reveals photos of Trump, Clinton, Gates, others.

Web Summary : Photos of Trump, Clinton, Gates with Epstein released, sparking controversy. Documents reveal friendships, raising questions about powerful connections and justice for victims.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.