नवा जिहादी जॉन भारतीय वंशाचा सिद्धार्थ?

By Admin | Updated: January 6, 2016 02:01 IST2016-01-06T02:01:22+5:302016-01-06T02:01:22+5:30

ब्रिटनमध्ये हल्ल्याची धमकी देणारा इसिसचा अतिरेकी हा भारतीय वंशाचा सिद्धार्थ धर हा असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याला ‘नवा जिहादी जॉन’ म्हणूनही संबोधण्यात येत आहे.

New jihadist John Siddhartha of Indian descent? | नवा जिहादी जॉन भारतीय वंशाचा सिद्धार्थ?

नवा जिहादी जॉन भारतीय वंशाचा सिद्धार्थ?

लंडन : ब्रिटनमध्ये हल्ल्याची धमकी देणारा इसिसचा अतिरेकी हा भारतीय वंशाचा सिद्धार्थ धर हा असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याला ‘नवा जिहादी जॉन’ म्हणूनही संबोधण्यात येत आहे.
सिद्धार्थ हा धर्मांतर करून मुस्लीम बनलेला आहे, असे सांगितले जाते. त्याचे सध्याचे नाव अबू रुमैसा असे आहे. तो ब्रिटनमध्ये जामिनावर होता. तो २०१४ मध्ये इसिसमध्ये सामील होण्यासाठी पत्नी आणि चार मुलांसह सीरियात पळाला, असे सांगितले जात आहे.
एका अधिकृत सूत्रांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडीओतील तपासाचा मुख्य केंद्रबिंदू धर हाच आहे. या व्हिडीओत पाच व्यक्तींची हत्या करताना दाखविण्यात आले आहे. हे पाच जण ब्रिटनसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप इसिसने केला आहे.
धर याची आई आणि बहीण यांनीही इसिसचा हा व्हिडीओ पाहिला आहे. ब्रिटिश मीडियाने धर याला ‘नवा जिहादी जॉन’ असे नाव दिले आहे. सिद्धार्थ धर याची आई शोबिता यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, ‘मी तो आवाज ऐकला आहे, पण केवळ या आवाजावरून अंदाज बांधता येणार नाही. मी आताच याबाबत काही बोलणार नाही.’ (वृत्तसंस्था)

Web Title: New jihadist John Siddhartha of Indian descent?